Skip to main content

कधी येशील कोंदणी??... (खास व्हॅलेंटाईन डे साठी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 11/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! :) कधी येशील कोंदणी??...
Taxonomy upgrade extras

आयुष्यात आनंदी राहाण्याचा फॉर्म्युला काय?

लेखक सिद्धेश यांनी बुधवार, 11/02/2009 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आनंदी राहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याची मला आपण माहिती द्या. म्हणजे मी तसा बदल करुन कसं वाटतंते बघेन आणि परत आपल्याला येथेच कळवेन.आपल्या सूचना शाळेनंतरच्या जीवनावर अवलंबून असूदेत. ही विनंती.

रोमिओगिरी..

लेखक शितल यांनी बुधवार, 11/02/2009 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
"जरा बरी पोरगी दिसली रे दिसली की खिश्यातुन दोन रुपयाचा कंगवा काढुन केसाला भांग पाडुन, साजरं तोंड करून मोकळे " हे वाक्य आमच्या ऒरगॊनिक केमेस्ट्रीच्या सरांनी कॊलेजमध्ये असताना कित्येकदा तरी वर्गातील मुलांना ऐकवले आहे, प्रत्येक वेळी त्या वाक्यावर आम्ही मुली हसु ओठात दाबत मनातील आनंद एकमेकींना डोळ्यातुन दाखवुन देत असु. एक वेळ कॊलेज मधील लेक्चर बंक केले तर चालेल पण संध्याकाळी महाव्दार रोड चुकता कामा नये असा अधिलिखित नियम काही रोमिओंचा असायचा. कार्टी वर्गात दिसायची नाहीत पण त्या रोड वर मात्र नक्की दिसतील. ;) असे आमचे सर वरचे वर म्हणायचे.

दुवा

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 11/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे. नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी.

आदर्श स॑घटना कशी असावी?

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 11/02/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सुजाण मित्रा॑नो, आपण नेहमीच वेगवेगळ्या स॑घटना,वेगवेगळी म॑ड्ळे पहातो.सार्वजनीक म॑ड्ळ,मित्रम॑ड्ळ,एकाच विचाराची काही माणसे एकत्र येवुव स॑घटना स्थापन करतात.मी सुद्धा माझ्या गावच्या एका म॑डळाचा सदस्य आहे.पर॑तु एक आदर्श स॑घट्ना कशी असावी याची माझ्याकडे काही माहीती नाही.मला माझ्या गावाकड्च्या मित्रा॑ना आदर्श स॑घटना कशी असावी हे सा॑गायचे आहे.मला आपल्या सर्वा॑ची खुप जरुरी आहे.या विषयी कोणाकडे काही माहीती असेल कि॑वा लि॑क असेल तर ती द्यावी अशी मी आपणा सर्वा॑ना विन॑ती करीत आहे.

सजनासाठी...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 11/02/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
सजनासाठी... एक अलबेली नार केला सोळा शिनगार. नववधूचा साज ती ल्यालि आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" काळे भोर तिचे डोळे मुखमंडल ते भोळे. नाजूक ती ओठांमधे हसली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" मेघमयी तिचे केस झाले मर्यादेची वेस. काया चांदण्यात पहा तिची न्हाली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" ल्यालि आकाशाची शाल सूर्य चुंबी तिचे भाळ. श्रावणातल्या धरेसारखी सजली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली"

रिसेशनचा उहापोह

लेखक त्रास यांनी बुधवार, 11/02/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आय्टीवाल्यांची ऐट टांगणीला लागून ६ महिने झालेत. अजुन किती महिने वाट (पहावी) लागणार आहे ते माहित नाही. रोज वेगवेगळ्या बातम्या कानावर येताहेत पण सर्वच निराशा. आयटीत करीयर करावे की नाही हा प्रश्न पडलाय- करायचे नसेल तर कय पर्याय आहेत तेही माहित नाही. कुठेही ह्याबाबत कौस्लिंग होत नाही. अनेक समुदायात ही सोडून इतर अनेक गोष्टींवर चर्चा दिसते आहे. आयटीचे भविष्य कसे आहे? जॉब मिळेपर्यंत काय करावे?

Naresh ला कसे आवरायचे?

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 11/02/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
Naresh सदस्य कालावधी 1 आठवडा 2 दिवस एकूण लिखाणे १० च्या वर !!!!! यांना कसे आवरावे?

असंच एक स्वप्न.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 11/02/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती. सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.

मुखवास

लेखक शुभान्गी यांनी मंगळवार, 10/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओवा साहित्य : ओवा,मीठ्,लिन्बू, भाजलेली तिळ, खोबरा कीस कृती: ओवा पाण्याने २-३ वेळा धुवून घ्यावा.चाळ्णीवर काढून घ्यावा. ओवा निथळल्यावर कापडावर काढून त्याला मिठ लावून उन्हात चान्गला वाळ्वून घ्यावा. चान्गला वाळला कि कढईत भाजून घ्यावा, भाजतान्ना त्यात लिन्बाचा रस , भाजलेली तीळ, खोबरा कीस घालावा. अवान्तर: नुस्ता ओवा खाल्ला कि तिखट लागतो.वरीलप्रमाणे केला तर त्याचा तिखटपणा खूप कमी होतो.