सांगू वडीलांची किर्ती.
गेले बरेच दिवस मिपावर मी मुलांचे शिक्षण,करीअर.पालक आणि त्यांचे मानसशास्त्र ,समुपदेशन या विषयांवरचे लेख अलीप्तपणे वाचत होतो. अलीप्तपणे अशासाठी की मी ह्या सगळ्या कचाट्यातून नुकताच बाहेर पडलो आहे. माझी मुलगी व्यावसायीक शिक्षणक्रम पूर्ण करून नोकरी ला लागली आहे. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तेव्हा रामदास मला नेहेमी आठवण करून द्यायचे की " हेमंत तू शिक्षकाचा मुलगा आहेस.(माझे आई आणि वडील दोघंही शिक्षक होते.) आणि खासकरून नानांचा विषय निघाला की रामदास परत आठवण करून द्यायचे .
उद्या १३ नोव्हेंबर रोजी माझे वडील मुकुंद दामोदर बर्वे यांची पुण्यतिथी.
माझे वडील (घरातली आणि परीचीत मंडळी त्यांना नाना म्हणत.) अचानक आणि फार लवकर गेले. मी तेव्हा जेमतेम दहा वर्षाचा असेन. आमचा दादा इंजीनीअरींगच्या दुसर्या वर्षाला होता. मी सगळ्यात धाकटा असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीबद्दलची माहीती मला माझी आई , आज्जी, दादा आणि इतर बहिणींकडून मिळत गेली . आमच्या नानांच्या करीअरची सुरुवात कल्याणच्या एका शाळेत व्यायाम शिक्षक म्हणून झाली. नोकरी करत करत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं . ही शाळा जनरल एज्युकेशन इंस्टीट्यूटची होती. याच संस्थेच्या इतर दहा एक शाळा तेव्हा होत्या.छबीलदास लल्लूभाई त्यापैकीच एक. ते उत्तम इंग्रजी शिकवायचे.मोडीवर हुकुमत होती. जाज्वल्य देशाभिमानी. जहाल नेतृत्वाला मानणारे. वाड्याच्या आदीवासींसमोर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवून त्यांना जिल्हा बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ते मुंबईच्या शाळेत बदलून आले.याच संस्थेचे ते सेक्रेटरी झाले.
त्याकाळी टीचर-एज्युकेशनिस्ट-काउंसीलर असे वेगवेगळे भाग नव्हते. एकदा शिक्षक म्हटलं की त्यात सगळंच आलं.
हे मी ठाम पणे म्हणू शकतो कारण नुकतेच त्यांनी लिहीलेले काही लेख मला सापडले. पन्नास वर्षापूर्वी लिहीलेले हे लेख अनुक्रमे लोकसत्ता आणि सन्मित्र (एसेम.जोशींचे) या पेपरात प्रसिद्ध झाले होते.
त्यापैकी एक लेख १९५६ सालचा आणि दुसरा १९६१ सालचा आहे. माझे वडील द्रष्टे होते. सध्या मिपावर जे प्रश्न मांडले जात आहेत त्याची भाकीतं या पन्नास वर्षांपूर्वीच्या लेखात तुम्हाला वाचायला मिळतील . माझ्या वडीलांच्या आयुष्यावर एक कादंबरी लिहीली जाउ शकते. पण आता ते प्रयोजन नाही म्हणून आज फक्त त्या लेखांची प्रत तुमच्यासमोर ठेवतो आहे.
शक्य तितका प्रयत्न करून स्कॅन कॉपीज दिल्या आहेत. वाचायला थोडे गैरसोयीचे आहे .
इतके दिवस हे कागद मिळाले नव्हते. आता मिळाल्यावर ते पुन्हा प्रकाशीत करणं हेच पुण्यस्मरण.
धन्यवाद.
शक्य तितका प्रयत्न करून स्कॅन कॉपीज दिल्या आहेत. वाचायला थोडे गैरसोयीचे आहे .
इतके दिवस हे कागद मिळाले नव्हते. आता मिळाल्यावर ते पुन्हा प्रकाशीत करणं हेच पुण्यस्मरण.
धन्यवाद.
वाचन
3244
प्रतिक्रिया
4