मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्फोटात फाटलेले डबे

ग्रीष्म · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्फोटात फाटलेले डबे बदलले जातील उद्या कदाचित..... रक्ताचे ते थेंब... मासांचे ते तुकडे .... अन घाबरलेले ते रुळ बदलले जटिल उद्या कदाचित ... मानसं कोम्बुनं घेतील स्वताला पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ... दारावर सुरु असेल मारामारी आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित पुन्हा दादर महिम जोगेश्वरी बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित .... पुन्हा त्याच डब्यात त्याच बोम्ब स्फोटावर चर्चा होतील उद्या कदाचित सगळ विसरून मानस पुन्हा तसच जगतील जीवन उद्या कदाचित... पुन्हा ११ जुलाई चा तोच दिवस दारावर चालू असेल आत जाण्यासाठी मारामारी आत कुणाची नजर चौथ्या सिट वर गाड्या मात्र धावत असतील जिव घेउन मुठीत पुन्हा ती वेळ टाळण्यासाठी उद्या कदाचित ...

वाचने 1262 वाचनखूण प्रतिक्रिया 1