Skip to main content

अटी शर्थी लागु

लेखक सुचेता यांनी सोमवार, 09/02/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
अटी शर्थी लागु!! सुबक सुंदर मनोवेधक वाचताना जाहिरात खालील तळटीप लक्ष वेधुन घेत असते अटी शर्थी लागु!! एखाद्या आकर्षक योजनेच्या सादरीकरणात गुंतुन जत असताना आपण स्वप्ण रंजनात सांगितले जाते.. नियम शर्थी लागु!! सवलतींच्या दिलखेचक जाहिरातीत भुरळतो आपण, अन शेवटी कळते आपल्याला अगदी अटी शर्थी चार्जेस लागु!! जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत..
Taxonomy upgrade extras

सारेगमप महा विजेता - कार्तिकी गायकवाड

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/02/2009 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालच रात्री सारेगमप चा शेवटला एपिसोड पाहिला. शेवटी निकाल एकदम अनपेक्षीत लागला. ह्या कार्यक्रामामधे काय काय घडले ते इथे साग्र संगित लिहिले आहे.. जरुर वाचा आणि आपल्या कॉमेंट्स पोस्ट करा. मी संपुर्ण कार्यक्रामावर काहितरी खरडलंय.. वाचा आणि कॉमेंट्स द्या.. असॉ, हे काही जरी असलं तरी कार्तिकी च्या विजयाचे महत्व कमी होत नाही.

कार्तिकी जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 08/02/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली. कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

अमृतराय झोपडीत का गेला?

लेखक चतुरंग यांनी रविवार, 08/02/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली. 'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले. ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्‍या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले. ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो!

वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी रविवार, 08/02/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला पि.एस्.पी. हवाय, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे तो. ''ओन्ली आय डोन्ट हॅव इट". इति माझा ६ वर्षाचा मुलगा. 'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला गेमबॉय घेतला ना, तो खेळ ना " इति मी 'अग आई गेमबॉय आता आउटटेड झाला, मला पि.एस्.पी. च हवा. त्यावर वेगळे गेम्स आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा. इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या क्लब ची वैगरे मेम्बरशीप घेउन बॅडमिंटन, टेनिस अथवा इतर तत्सम जे सोकॉल्ड साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो.

कवि भूषण

लेखक शिशिर यांनी रविवार, 08/02/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही. कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत. कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे.

एक वेडी आशा

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी रविवार, 08/02/2009 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक वेडी आशा एक वेडी आशा कुठेतरी मनात जन्मत असते प्रत्येकाच्या कधीतरी बदलेल हे सारे कधी ना कधी होईल की सारे गोडच गोड छान सिनेमातल्या सारखं रोज सकाळी नव्याने जन्मते अन रोज रात्री मिटुन जाते लाजळुच्या पानासारखी प्रत्येकजण जपत असतो तिला अगदी जीवापाड स्वतःच्या लेकीप्रमाणे जोवर तिला धक्का पोचत नाही तोवर नि तोवरच तो उभा असतो अगदी ठामपणे एखाद्या वटवॄक्षासारखा म्हणून त्यावर घाव घालू नका तुमची कुर्हाड तुटेल नाहीतर तो उन्मळून पडेल एखाद्या छोट्याश्या फांदीसारखा जपा अगदी मनापासून जपा तिला कारण ती आहे वेडी आशा तुमची, माझी, प्रत्येकाची एक वेडी आशा -- ज्ञानदा कुलकर्णी