पाण्याच्या थेंबासाठी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाणी वाया घालवू नका असे मुलांवर ओरडतांना
आठवत असते मी..माझ्यातल्या एका मुलीला..
आज नळ आला नाही ..
..
दोन हातात बादल्या धरून
मोठ्या बंगल्याला वळसा घालून
शेजार्याच्या मालकीच्या विहिरीवर पाण्यासाठी जाणार्या..
लहान भाऊ तेव्हा अनेक प्रश्न विचारून भंडावत असे मला..
तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर
मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून
भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव
आतल्या आत ओढायची..
ओढलेला चेहरा हासरा ठेवण्याच्या प्रयत्नात
फ्रॉकवर सांडलेल्या पाण्याचे भान यायच ...जेव्हा मीच बघायचे
माझ्याकडे
तिर्हाइताच्या नजरेने..
विहिरीच्या दगडी काठाला आपटत आपटत ..बादली आत जायची.
.. हिंदकळत वर यायची
त्या आवाजात हरवलेला माझा आवाज आजतागात मला ऐ़कू आलेला नाही...
मुलांच्या दंग्यात पाण्याचा नळ मात्र तसाच वाहतो आहे...
वाचने
3330
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुरेख
खरंच
साला, ही
In reply to साला, ही by विसोबा खेचर
सध्या
ज ब र द स्त
सुंदर कविता
वा
सुंदर
कविता
वास्तववादी
बोधप्रद
अरे वा!
शक्यता
दोनदा आल्याने प्रकाटाआ
सुंदर कविता