Skip to main content

(विडंबन केलं आहे)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 29/07/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार
काव्यरस

श्रावणातला पाऊस

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 28/07/2009 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा क्षणात हसणारा, क्षणात रुसणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा खट्याळ, खोडकर, उगाचच छेडणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा दु:खावर हळुवार फुंकर घालणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवेळी अडवून चिंब भिजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा कणाकणात हिरवी स्वप्नं रुजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवचित येणारा, अचानक जाणारा
काव्यरस

मी आणि श्रावण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/07/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची. कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला.

(कविता हवी आहे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 28/07/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी पुन्हा एकदा मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल. गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे. त्यातला कविता हा प्रकार मला खुप आवडला खाली जे विडंबन आहे ते माझे आहे.मला ह्या वरती कविता करुन हवी आहे. माझ्या माहिती प्रमाणे बर्‍याच मिपाकरांची नावे कवितांसाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे. कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा....

नातं...

लेखक दशानन यांनी मंगळवार, 28/07/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... ! देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे. ठीक, अर्धे तरी दे. ठीक आहे हे घे... ! आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची..

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.