Skip to main content

(विडंबन केलं आहे)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2329
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ओले चिंब झाले आकडे
ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे (बेलाचा फॅन) टारझन

In reply to by टारझन

>>ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे हेच म्हणतो. बाकी शेअर बाजार आणि इतर कल्पना छान. (टार्‍याचा मित्र) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

बेलाशेठ विडंबन आठवले. ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा.

In reply to by सहज

ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा. बरोबर आहे. (बिनचूक)बेसनलाडू आणि अशा मेल्टडाउन् मुळे दरदरून घाम फुटल्याने तनही ओले ;) (घामाघूम)बेसनलाडू

मस्त विडंबन आहे.. कमी शब्दांत चपखल बसलेल्या भावना.. आवडले... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)