Skip to main content

परबुभाई

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 16/07/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही युद्धे शस्त्र न वापरता शब्दाने जिंकता येतात. " मामाजी, या ऑफिसवर. 'माणसे' येउन पोचलीत. शेठ नंबर १ चा फोन आला. शेठ नंबर दोन ना फोन द्या. काही सुचना देउन मी शेठ्च्या ऑफिसवर पोचलो. अंगावर खास झब्बा आणि लेंगा घालुन मी ऑफिसवर पोचलो. मला बघताच दोन्ही शेठ उठुन उभे राहीले आणि मुख्य खुर्ची माझ्या साठी रिकामी केली. "आवो, प्रभुभाई", शेठ नंबर म्हणाले.(सुचने प्रमाणे) पोल्ट्री इंडस्ट्री मधे सर्वे सर्वा असलेल्या शेठ ना ही कृती करताना मरणोपरान्त वेदना झाल्या असतील ह्याची मला कल्पना होती. पण काय करणार प्रसंगच तसा होता. टेबलवर पुढे ३ माणसे होती. एक पांढरी पँट, पांढरा शर्ट, पांढरे बुट.

प्रपोजल्

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/07/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी, पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर घातलाय पावसाने आधीच तुझ्या गळ्यात ओल्या मातीच्या ठिपक्यांचे घातलेस मेंदीसारखे पैंजण तुझे तूच पायात डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं, ढग वाजवून सांगेन म्हटलं, वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं, तर स्वत:भवतीच गिरक्या घेत डोळे चिंब मिटून तू पावसाच्या मिठीत आणि माझे शब्द, सूर सगळे चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत या भिजल्या-थिजल्या कवितेचं प्रपोजल् व्हायची वाट बघत
काव्यरस

हिरवाई

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 16/07/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
इथे वाढला वसंत, दंवे ओलावली माती सुखकर थांब ऐकु दे समीरा गीत हिरवाईचे निवांत क्षणभर थांब जरा बोल हळु ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर बघ नि:शब्द रानवेली अलवार करीती नाजुक कुरकुर ओज कसे वृक्षगर्भी ओल्या पानांची किंचीत थरथर झाडांमधुनी नागमोडी वाट जशी कुणी नार अटकर हे रान हिरवे लाजले कोवळी जणु नववधु नवथर इथे ओलावला वसंत पालवी गाते हिरवाई निरंतर सभोवार सौंदर्य फाकले क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर विशाल

बापू!! (व्यक्तिचित्रण)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 16/07/2009 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे बापू, जाऊन जरा नविन शेटच्या शेडवरून आपली बिमं घेऊन ये.." "बापू, इचलकरंजी सहकारी मधे हा चेक टाकून ये..." "बापू.. ३ नंबरचा माग बंद का पडलाय बघ जरा.." एक ना हजार! हा बापू म्हणजे पुलंच्या "नारायण" चं पॉवरलूम मॉडेल असंच म्हणावं लागेल. इचलकरंजीमध्ये माझ्या भावाच्या पॉवरलूमच्या कारखान्यात असलेला हा एक नमुना. नमुना अशासाठी की, कोणतंही काम करायला हा जसा एका पायावर तयार असतो तसंच कोणताही प्रश्न विचारताना तो लोजिकली बरोबर की चूक हा विचार करणं म्हणजे घोर अपराध केल्यासारखं त्याला वाटतं. अंगकाठी म्हणाल तर हाफ पॅन्ट घालून आला तर दहावी-बारावीचा विद्यार्थी वाटेल. २ मुली आहेत त्याला.

(तो लिहितो तेव्हा...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/07/2009 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल!
काव्यरस

डेट्रॉईट्मध्ये ब्लॅक अँड व्हाईट चा कार्यक्रम

लेखक अमेरिकन त्रिशंकू यांनी बुधवार, 15/07/2009 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम तारीख आणि वेळ : रविवार, २ ऑगस्ट २००९, दुपारी ४:०० ते ७:०० ठिकाणः नोव्हाय हायस्कूल २४०६२ टाफ्ट रोड, नोव्हाय, मिशिगन ४८३७५ गायकः हृषिकेष ऱानडे, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, सावनी रविंद्र संचालनः राहुल सोलापुरकर दिग्दर्शन मिलिंद ओक तिकिटांसाठी संपर्क: (१५ आणि २० डॉलर्स) पराग वाकणकर (दुवा क्र. २) - २४८-७३५-०२०३ (pwakankar@gmail.com) शौनक आठवले (दुवा क्र. १) - ७३४-९४४-६२६६ (bnwmi@yahoo.com)

खरडीसंबंधी सूचना..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 15/07/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा. आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल.

सुख म्हंजे नक्की काय आसत

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 15/07/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे पैसा, श्रीमंती वगैरे वगैरे .... ईती सर्व उद्योगपती ... सुख म्हणजे आध्यात्म ध्यान केल की मनशांती मीळते. वगैरे वगैरे .... ईती सर्व सादूबाबा "ये आये ! मी शिर्‍याबरूबर मूंबयला जाव ?" शिर्‍याची थोरली भन मूंबयला दिल्ती. भावजी पोस्टमन व्ह्ते. खारपाड्यान त्यांचा लय रुबाब. शिर्‍या सुट्टीत दोन दिसांसाटी चाल्लावता. मीनी मूंबय कदीच बगीतली नवती. शिर्‍यान ईचारल तसा सूसाटलु. "आर यकटा नको जाव त्या शिर्‍याबरूबर. तू ल्हान हाईस आजुन." आय "ल्हान कना? ल्हान कना? आता त आटवी पास झालो न नव्वीत झेलो न?" "म्हुन क झाला र ?तू जाव नको बाला.

पारध झालेला तो पारधी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 15/07/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे. १९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा.

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

लेखक limbutimbu यांनी बुधवार, 15/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे!