खरवस
गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे.
पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या.
गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या.
मिसळपाव