फोडणीचा ऊस
फोडणीच्या गंडेर्या
ही पाककृती http://misalpav.com/node/8730 या लेखना वरून आठवली आहे. त्यामुळे लगेच फोटो उपलब्ध झाला नाही
साहित्य : मस्त पुंड्या उसाच्या गंडेर्या तीन वाट्या, तेल १ चमचा , मोहोरी १ चमचा, हळद ,कढीपत्ता , लाल मिर्ची , लिंबाचा रस तीन चमचे, मीठ चवीपुरते.
मस्त पुष्ट पुंड्या उसाच्या साधारण अर्धा इंच आकाराच्या गंडेर्या करून घ्याव्या, त्या मिठाच्या पाण्यात तासभर भिजत घालाव्या,
तेल तापवून त्यात मोहोरी हळद आणि मिर्चीची फोडणी तयार करावी.
उसाच्या गंडेर्या कढईत गरम कराव्या.
मिसळपाव
विशाल.