खुन्नस !
हे खरंतर (माझंच) नक्कल - चिकट लिखाण (कॉपी-पेस्ट) आहे. आधी एका संकेतस्थळावर प्रकाशित केलेलं. पण म्हटलं मि पा वर लिहायची सुरुवात ह्यानंच करावी. तुका म्हणे त्यातल्या त्यात..... !
नाही हो... ही खुन्नस म्हणजे एकेरी वाहतुकीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पुणेकराकडे सिग्नल तोडणारा पुणेकर ज्या नजरेने बघतो ती खुन्नस नाही. किंवा हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांनी बिचाऱ्या श्रोत्यांवर काढतो तशीदेखील खुन्नस नाही. आपल्याला अभिप्रेत खुन्नस वेगळी आहे.
खुन्नस.... तुम्ही म्हणाल अचानक खुन्नस ह्या प्रकाराबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होण्याचं कारण? ते ही तसं इंटरेस्टिंग आहे.
मिसळपाव