Skip to main content

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

हागणदारीमुक्त गाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शनिवार, 25/07/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने नवीन नियम काढला हाय, आत उघड्यावर बसायचे नाय, सगळ्यानी शौचालय बांधायचे , आण गाव हागणदारीमुक्त करायचे. उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय, कधी कधी तर एका दगडातच काम भागतय, मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय, तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात, ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात , कारण गावातली हागणदारी मुक्त नाय, तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय. गावातली माणसं पण लय हुशार असत्यात, पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात, पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात, आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात. आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली, हा

जीवती

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 25/07/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
दादर स्टेशन. बाहेरची एक गाडी आली आहे. दुसरी सुटणार आहे. टॅक्सी वाल्यांचा गराडा. हा बहुतेक माझ्या पावलावरून नेणार टायर. मी मागे होतो. हा बहुतेक चिरडणार मला. मी उडी मारतो. पायातला एक बूट मागे पडला. अरेच्चा अंधार फारच आहे. बूट मिळाला. पायात घातला. पण अंधार का बरं एव्हढा ? दादर स्टेशनवर लाईट कमी आहे. रांगेत उभा राहीलो. तिकीट काढायचं आहे.तुडंब गर्दी . लोकलनी जाण शक्य नाही.महालक्ष्मीनी जावं हे बरं. आतापर्यंत पावसात भिजलो होतो. आता रांगेत उभं राहील्यावर उकडायला लागलं आहे. समोर एक जोडपं उभं आहे. बाईच्या कडेवर लहान मूल आहे. खास आईबाबांनी घ्यायची पिशवी आहे.

जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 25/07/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत लिहिणारे जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक एका व्यासपीठावर कधी च एकत्र आले नाहीत. किंबहुना त्यांची पुस्तकेही एका शेल्फवर कधी आली नसतील. प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल निराळी ,वाचक वर्ग निराळा, विषय निराळे. सु शि वाचणारा जी ए वाचणार नाही काकोडकर वाचणाराला गुरुनाथ नाईक वाचवणार नाही. ह्या सर्व एवंविषिष्ठ गुणांमुळे त्यांची तूलना करता येणार नाही. सुशिनी फारसे शृंगारीक लिहिले नाही. थोडेसे लिहिले तेही कॉलेज च्या तरुणाई च्या माहोलात.

"बट-शेवंतीची फुलझाडं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/07/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे,आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची. मी कर्णिकांना म्हणालो, "हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?" मला दादा कर्णिक म्हणाले, "गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-reality

'हाय...' लताबाईंचा!

लेखक प्रदीप यांनी शुक्रवार, 24/07/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्य्या गांधाराच्या लेखावरून काही इतर, विषेशतः लताबाईंच्या हिंदी चित्रपटगीतांमधील विशेष स्थानांची आठवण झाली. ती त्यातील 'हाय..' ह्या शब्दाच्या अत्यंत परिणामकारक उच्चारावरून. लताबाईंचे गाणे अगदी अंडरप्लेईंगचा उत्तम नमुना आहे. कोठेच भाव उतू चालले आहेत असे दिसत नाही.

हास्यमिसळ (१)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 24/07/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आया नव्या विनोद प्रकारात मी वेगवेगळ्या ठीकाणी लिहिलेल्या सुचना किंवा घोषवाक्ये किंवा वाक्ये एकत्र करून, तसेच त्यात आणखी मसाला टाकून त्यांची मिसळ करून तुम्हाला देणार... ती मिसळ खाल्ल्यावर तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा! या वेळेस मी बसमध्ये लिहिलेल्या वाक्यांची मिसळ बनवणार आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीशिवाय बस मागे घेवू नये.
  • सुरुवातीच्या स्थानका व्यतिरीक्त प्रौढ महिलांना मागच्या दरवाज्यातून उतरणास मनाई आहे.
  • चालत्या बसमधून उतरू नका.

आम्हाला सगळे कळते

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 24/07/2009 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावी प्रवेशासंबंधी प्रश्न मी पुर्वी विचारल्याचे मिपाकरांना आठवत असेलच. सध्या प्रवेश चालू आहेत. मला एका प्रसिद्ध ज्यु.कॉ. ला खालीलप्रमाणे अनुभव आला. काल दुपारी २ वा आंतरजालावर गुणवत्ता यादी लागली व लगेच ज्यु.कॉला भेट दिली. तेथे फळ्यावर ही सुचना लावली होती, "अकरावी प्रवेश: यादी ५ वा. लावण्यात येईल." खाली एक आणखी उपसुचना होती, "वेळ नंतर कळवण्यात येईल". कसली वेळ नंतर कळवण्यात येईल काहीच कळत नव्हते. संध्याकाळी ५ वा. पुन्हा ज्यु.कॉला हजर. तोबा गर्दी. नवे काय कळाले?- काहीच नाही तीच आंतरजालावरील माहीती तेथे होती. बाकी काहीही माहीती कळली नाही. दुसऱ्या दिवशी ११ ला ऍडमिशन फॉर्म मिळतील एवढेच कळले.

अंतराळशास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 24/07/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे- १. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी. २. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे.

मुंबईच्या किनार्‍यावर लाटांचे आक्रमण

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 24/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या किनार्‍यावर धडकणार्‍या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही.