लेखनप्रकार
दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... !
देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे.
ठीक, अर्धे तरी दे.
ठीक आहे हे घे... !
आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची.. कधी तक्रार करायची नाही ना आईला सांगायची.. ! आमचे नेहमीचेच ठरलेले मला पैसे मिळाले की अर्धे ताईला व तीला मिळाले की अर्धे मला पण भांडून असे आरामात नाही ;) मज्जा येत असे.. ते दिवसच वेगळे होते.. !
माझ्या बहिणीची संख्या देखील अफाट आहे... घरातल्या घरातच सांगतो ना... माझ्या मोठ्या माऊशीच्या दोन मुली, माझ्या लहान माऊशीच्या तीन मुली, मामाच्या दोन, काकांच्या दोन मुली, अत्याची एक मुलगी व लहान अत्याची दोन मुली... ह्या १२ जणी व इतर दुरच्या पाहूण्यातील ५ जणी म्हणजे मी त्यांना ओळखतो पण त्यांच्या आई-वडीलांना जास्त ओळखत नाही अश्या... ह्या घरातल्या... सर्वजणामध्ये मी एकुलता एक कुलदिपक :D ना वडीलांच्या पाहुण्यामध्ये मुलगा ना आईकडच्या मध्ये.. त्यामुळे सर्वात जास्त लहानपणी लाडावलेला सुध्दा मीच.. व माझ्या सर्व बहिणीमध्ये व माझ्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे आमचे वय.. सर्वांच्या मध्ये एक्-दोन वर्षाचे अंतर... त्यामुळे आमचा दंगा चालूच असायचा, जेव्हा अजोबा होते तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीला व दिवाळीला सर्वजण एकत्र होत... मामाचा वाडा एकदम भरुन जात असे व त्यात आम्ही सर्व चिल्लीपिल्ली... जबरदस्त दंगा ! मी नेहमी म्हणायचो आईला कि बरं आहे रक्षाबंधन मे मध्ये येत नाही... सगळ्यांना पैसे द्यावे लागले असते ना मला ;) पण भाऊबीजला माझी चंगळ असायची आजोबा ओवाळणी साठी चिल्लर १५-२० रुपये देत असतं.. मी त्यांचे आठ-आठ आणे मध्ये करुन आपल्या खिश्यात ठेवत असे व सगळ्यांना पन्नास पैसेच ओवाळणी देत असे व बाकी अर्धे आपल्या खिश्यात..! जसा जसा मोठा झालो तसा तसा हिस्सा घेण्याचा प्रकार बंद झाला व त्यांना ओवाळणी पुर्ण मीळू लागली.. मग मी त्यांना असेच एकदा गप्पा मारता मारता सांगितले की मी असे करत असे व तुमची अर्धी ओवाळणी ढापत असे ... सगळ्या मुलींनी मीळून मला चांगलाच धोपटला... ते असे कि येता जाता दे रट्टा... मार खावून खावून वैताग आला व त्याना मारुन मारुन... मी पण काय करणार.. कुणाकडे तक्रार करु शकतो होतो.. आजोबांच्या कडे जाऊन सांगितले तर... त्यांच्या हातात नेहमीच छडी.. त्यामुलींचा मार परवडला पण ह्यांचा... नको.. ! आई कडे.. जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात... ;) चप्पल.. झाडू.. लाटणे.. तांब्या... हातात येईल त्या गोष्टीचा प्रसाद मिळण्याची शक्यता जास्त त्यामुळे तोंड दाबुन मुक्क्याच्या मार.. अशी माझी गत.. पण मज्जा येत असे ! आम्ही आज ही कधी भेटलो तर सर्वात प्रथम ह्याच गोष्टीचा उल्लेख होतो की सगळ्यांनी मीळून मला कसा धुतला होता तो :D
बहिणी म्हटले की आमचे नाते पक्के होते... इकडे तिकडे भटकताना देखील खुपजणी अश्या भेटल्या की जन्माचे नाते असावे... ! मला जरा देखील दुखलं-खुपलं कि त्यांना देखील त्रास होतो हे मी अनुभवलेले.. बेंगलोरची अनिता असो.. वा जयपुरची प्रिया.. अथवा दिल्लीची अनामिका... अथवा येथे मिपावर भेटलेली ताई गँग असो... ! सगळ्याच जबरा.. ! हे नातेच असे विचित्र आहे की जीव ओवाळून टाकावा ! कोण राज म्हणतं.. कोण दा.. तर कोणी दादा... तर कोणी.. काळ्या.. कोण बेबट्या.. तर कोणी... मस्सकली.. तर कोणी राजाड्या.. तर कोणी माजुरड्या... चालू असतं .. सगळ्या माझ्या टोपण नावांची लिस्ट द्यायची तर येथे एक अखा लेख लिहावा लागेल.. ;) कधी फोनवर तर कधी मेल द्वारे... कधी व्यनी ने तर कधी खरडीने... मिपाने मला काय दिले तर... अशी काही नाती दिली जी मला जन्मभरासाठी पुरतील... धन्यवाद तात्या ;)
आता रक्षाबंधन येईल...अक्षरशः दोन्ही हात भरुन जातील येवढ्या राख्या... सर्वात जास्त आनंद देत असेल मला तर रक्षाबंधनाचा दिवस... कितीतरी जणी माझ्या आठवणी काढतात व आठवणीने राखी पाठवतात.. ह्यातील काहीजणी तर मला भेटल्या सुधा नाही आहेत.. पण तरी ही एक नाते आहे... भाऊ-बहिणीचे.. मी नेहमी म्हणतो देवाने मला काहीच कमी दिले नाही.... माझ्यावर तर देवाचा खास वरदहस्त आहे की काय असे वाटते कधी कधी.... !
माझा एक मित्र जो माझ्या सोबत राहत असे तो रक्षाबंधन व त्यानंतर येणा-या राख्या अक्षरशः डोळे फाडून फाडून पाहत असे.. व वर कमेंट... राज भाई.. बहोत लकी हो यार... तुम्हे चाह ने वालों की कमी नही है दुनिया में !
येस , खरोखर मी लकी आहे.... थॅक्स... गॉड !
मिसळपाव
नातं..
लय
:-)
In reply to :-) by सहज
छान आहे
सुरेख
दादा, दे ना,
वा!
खुप सुरेख,
मस्त !
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिर्षकावर
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>शिर्षकाव
छानच आठवणी आहेत, राजे.
आठवणी जाग्या झाल्या....
लेख आवडला
In reply to लेख आवडला by ऋषिकेश
>>मानलेल्या
सुरेख लेख
वा ! मस्त
मनातल्या
In reply to मनातल्या by स्पृहा
>>>मनातल्या
वा!!!