डिस्क्लेमर:
धर्म या संकल्पनेबद्दल, मी, माझ्या अल्पमतीने, केलेला हा विचार आहे. एकामागून दुसरा विचार निघत जातो, प्रश्न पडत जातात अन त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कदाचित थोडा विस्कळीतही वाटेल.
मला गद्य लिहिणे काही तितकेसे सहज जमत नाही. मांडायचा प्रयत्न करतोय. चु.भु.द्या.घ्या.
----------------------------------------------------------------
धर्म. काय शब्द आहे हा नाही? जबर. काय व्युत्पत्ती याची तेही नक्की माहीत नाही. पण हा शब्द, त्यामागची संकल्पना अस्तित्वात यायचे मुळात कारणच काय असावे? जर धर्म या संकल्पनेशिवाय माणसे जगली असती तर कशी जगली असती?