Skip to main content

आणि कॉमन मॅन बोलला!

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

गोपालकाला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त शिर्षक असलेल्या http://misalpav.com/node/8940 या धाग्यातील पाककॄती नंतर सापडण्यास सोपे जावे म्हणून पाककॄती विभागात टाकत आहे. दही हंडी आणि कृष्णजन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्च्छा. नेटावर सर्च केल्यावर गोपालकाल्याची पुढील रेसिपी मिळाली. भिजवलेले पोहे, खोवलेला नारळ, काकडी - हि. मिरच्या आणी आलं बारिक चिरून , दही , जिरे , मीठ, साखर, फोडणी साठी तूप. तूपाची फोडणी करुन त्यात जिरे , मिरच्या, आले घालणे. ही फोडणी पोह्यांवर ओतणे. त्यात दही , काकडी आणि खोवलेला नारळ घालणे, चवी नुसार मीठ व साखर घालणे.

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/08/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे. आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल.

पुरुषांचेही नियम- ही घ्या उदाहरणे

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 14/08/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक खूप फनी फॉरवर्ड आली. त्यात एक ऍटॅचमेंट आहे त्यात लिहीले आहे- "आम्ही स्त्रीयांनी पुरुषांसाठी घालून दिलेले नियम बऱ्याचदा ऐकलेत; आता वेळ आली आहे पुरुषांनी काही नियम करण्याची." पुढे काही नियम आहेत ते भाषांतर करुन त्यातील मासलेदार नमुने येथे दिली आहेत- १. तू जाड झाली आहेस असे तुलाच वाटत असेल तर तू सरळ जाडी कमी करायला सुरुवात करावीस; आम्हाला विचारु नये की, "मी जाड झाली आहे का?" २. डोकेदुखी सलग १७ महिने असेल तर जनरली डॉक्टरला दाखवतात ३. तुला जर काही सांगायचे असेल तर ते कमर्शियल ब्रेकमधे सांगावेस ४. कोलंबसला कोणत्याही दिशादर्शकाची गरज पडली नाही, आम्हालाही ती नसते ५.

नाक

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/08/2009 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचे शीर्षक "नाक" असेच आहे. खरेतर नाक हा मानवी शरीराचा एक ठसशीत अवयव. पण आपण त्याच्या कडे तसे उपहासानेच पहातो. माणसाच्या चेहेर्‍याकडे पाहिल्यावर नजरेत भरतात ते दोन अवयव. डोळे आणि नाक. डोळ्यांबद्दल लोकानी शायरानी फार काही लिहिलय. डोळे जुल्मी असतात , डोळे लबाड असतात , डोळे खट्याळ असतात, डोळे बोलके असतात, डोळे पाणीदार असतात्.....असे बरेच काही. आता पाणीदार हे विषेशण डोळ्यांपणे नाकालाही लागु होते. पण पाणीदार डोळ्याची मुलगी असे म्हंटल्यावर एखादी झाशीची राणी आठवते. तिची करारी मुद्रा नजरेसमोर येते.

राधा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 13/08/2009 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळींना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! From Pandurang" alt="" /> त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी त्या साजिर्‍या सुखाच्या स्वप्नात दंगले मी ते स्वप्न सत्य होते, की
काव्यरस

नमन

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 13/08/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

एक प्रश्न माझाही .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 13/08/2009 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
विमुक्तांचं एक कोडं वाचताना मलादेखील लहानपणी कायम पडणारा एक प्रश्न आठवला. (त्याचं उत्तर मला आजही अज्ञात आहे) प्रश्न असा आहे. पाण्याची रासायनिक संज्ञा आहे H2O, यापैकी ऑक्सीजन हा ज्वलनास मदत करतो आणि हायड्रोजन स्वतःच ज्वलनशील आहे. मग हे दोघेही ज्वलनाला मदत करणारे असे घटक असताना पाणी जळत का नाही? (इथे थट्टेचा विचार नसुन ही एक प्रामाणिक शंका आहे.) विशाल.