हे जळणं आता रोजचंच आहे
बंदुकीच्या गोळीशी आमचं
नातं फार जवळचं आहे
बंदुक माझ्याकडेही आहे
पण चापावर बोटच येत नाही
मी अगदी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे
मी कधीचा शांतता मागतोय
ते मात्र आर. डी. एक्स. देताहेत,
आणि देताहेत
निष्प्राण, जळलेली, तुटलेली
माझ्याच स्वप्नांची, आकांक्षाची प्रेते
पण मी शांत आहे
...........कारण मी भारतीय आहे
त्यांचा जोर वाढतोय
माझा भारत कधीचा जळतोय
ते निर्धास्त आहेत
पुन्हा पुन्हा नव्या जोमाने
बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत
त्यांना माहितीये मी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे
खबरदार..
माझा अंत पाहु नका
मी जळेन तुमच्या वणव्यात
पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला
ती एकच ठिणगी पुरेशी आहे.
कारण..
विसरताय तुम्ही..
वरवर शांत भासत असलो
तरी अखेर...मी भारतीय आहे.
विशाल.
याद्या
2533
प्रतिक्रिया
13
लेखनविषय:
मिसळपाव
आपण भारतीय कमालीचे शांत आहोत.
सहमत आहे
दुर्दैवान
ह्म्म..
महात्मा
असे होय..
In reply to महात्मा by विशाल कुलकर्णी
काय झाले, विशाल?
असे वागले की...
आभार !
पण उरेन
अप्रतिम
असेच होवो !
In reply to अप्रतिम by आशिष सुर्वे
जहाल वाद्यांचे विचारांचा प्रसार व्हायला पहीजे...