Skip to main content

लाँग ड्राईव्ह...........पुणे ते मुंबईदरम्यान!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/08/2009 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
हा विकांत पुण्यात बहिणीकडे गेला. कालच्या रवीवारी सकाळी प्रचंड कंटाळा आला होता. कुलकर्णीबाई आणि आमच्या बहिणाबाई सकाळी सकाळी केतकावळ्याला श्री बालाजींच्या दर्शनाला गेल्या होत्या. भाऊजी नाशिकला गेलेले. एकटाच होतो, काय करावे ते सुचेना. मग सरळ भाऊजींची बाईक काढली आणि निघालो. चिंचवड क्रॉस करुन सोमाटणे फाट्यावरुन एक्सप्रेस हायवेच्या दिशेने निघालो. मधला छोटासा घाट ओलांडला आणि कॅम सरसावला.... वेगवेगळ्या घाटांचे फोटो आजपर्यंत खुप काढले होते. म्हणुन काहीतरी वेगळं शोधत होतो, तेवढ्यात आकाशाकडे लक्ष गेलं. पावसाअभावी भेगाळलेली जमीन पाहिली होती.

लट उलझी सुलझा जा बालमा ...

लेखक बामनाचं पोर यांनी मंगळवार, 04/08/2009 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांनी दर्शनी पानावर यु-ट्युब वरच्या त्याच्यांच सदस्यत्वात अपलोड केलेल्या तेलगु गाण्याची माहिती दिली. सहज उत्सुकता म्हणुन तात्यांनी अजुन काय यु-ट्युबवर ठेवले आहे पाहीले तर " बिहाग " रागातली " लट उलझी .. " ही तात्यांनी गायलेली अफाट लोकप्रिय बंदिश सापडली... क्या बात है..!! मग काय आजच्या दिवसाचे तरी खाद्य मिळाले मेंदुला.. बिहाग हा एक शृंगारीक राग.. तो फार दिवसांनी घरी परततोय.. "ती आतुरतेने वाट पाहात असेल" लवकर पोहचावे म्हणून तो आडमार्गाने जाणारी पायवाट पकडतो.. झाडी-झुडपातून जाणारी वाट.. मधे एक छोटासा ओढा लागतो.. अन तो थबकतोच . कारण पलीकडे ती उभी आहे..

काय, हवय तरी काय? :) :)

लेखक मन यांनी सोमवार, 03/08/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
वा! उत्तम! http://www.misalpav.com/node/8765 ("विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा") भन्नाटच दिसतय! एकाहुन एक असले "विषय" दिसताहेत निबंधासाठी. आणि त्यातही "विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक" हा भलताच भारी प्रकार दिसतोय. च्यायला पण आता आप्ल्या सारख्या गरिबाला हे सगळच (तूर्तास अविवाहित आणि "कुमार" असल्यानं)नवीन आहे. जरा धीर गंभीर भाषेत मोठ्ठा निम्बंध्/प्रबंध लिहुन आपणही माराविकी फुशारकी . पण आपल्याला कळलय ते बरोबर आहे का? काही प्रश्न पडताहेत तिच्यायला.

फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोरी अक्वीनो यांची हृद्य आठवण

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 03/08/2009 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी
दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला.

क्रिकेट आणि मी......

लेखक dineshpalkar यांनी सोमवार, 03/08/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
O:) mala mazya school madhe Aalela Anubhav mala lahanpanapasun cricket khelaila aavadto. me school madhun ghari aalyavar daptar bajula takun saral groundvar pohchat aasaycho. aani sarva mule khelnyasathi tayar aasaychi. mala cricketmadhe khup Aavad hoti. pan khelun aalyavar me sarva gruhapat karat ase. mala cricketch aalela anubhav aani shikshya yabhddal sangat aahe. me 9 vit hoto.

मल्हारसांज

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 03/08/2009 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मल्हारसांज गर्भारलेली उदरी निशा अशांत ओली दिशांची दिशांना पुन्हा आर्त साद डोहाळे पुरवी जलांच्या पखाली घनभार हल्के जाता झरून कृष्णांबरही झुके सावरून आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली घनन घनन घनवृंद घुमा सागर पाश क्षितिजी गनिमा पश्चिमा सलज्ज निरखे प्रतिमा लहरींच्या अधरी, पवनाच्या चाली घुले श्यामरंगी, नभाची निळाई विरत्या परिघा, समीपाची घाई अधीरल्या प्रभेची कवडशी धिटाई रवी पांघरूनी निजे मेघशाली

शाळा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 03/08/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी नेरळपासुन जवळ असलेल्या सगुणाबागेत (निसर्ग निकेतनात) एक विकांत घालवण्याचा योग आला. आम्ही शुक्रवारी रात्री थोडे उशीराच पोहोचलो, त्यामुळे जेवण करुन थेट पडी मारली. आम्ही तिथल्या पाँड हाऊसवर उतरलो होतो. सकाळी उठल्यावर पाँड हाऊसच्या बाहेर पडलो तो समोर छान शाळा भरलेली.

सप्तपदी आणि माझी भूमिका - भाग २

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 03/08/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तपदी वरील चर्चेचा समारोप करायचा विचार आहे. माझी भूमिका अधिक स्पष्ट व्हावी अशी काही जणानी मागणी केल्या मुळे मूळ लेखातील भूमिके संदर्भातील उतारा परत एकदा येथे देतो.