Skip to main content

फिक्शन...

प्रकाशित मुखपृष्ठ
वेगाने होणारे शहरीकरण , तन्त्रज्ञानातील बेसुमार प्रगती याचा परिणाम ५० वर्षांनी (कदाचित) असा झालेला असेल.. त्यावेळच्या बाप- लेकाचे संवाद या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न.... कुण्या सकाळी बाबा वाचती , साईट वरचा पेपर एक . जूने पुराणे पुस्तक वाची , बाजूलाच त्याचा लेक . "मोर म्हणजे काय हो बाबा "? पोर विचारी बापाला. "Don't ask me silly questions "! बाप खेकसे पोराला..! "केतकीचे बन कोठे असते..? सांगानाहो मजला बाबा" मात्र आता बापाच्याही , मनावरचा सुटला ताबा. खाडकन मग बाबा बघतो , काय वाचतेय अपुले पोर. पुस्तकावरी त्या लिहीले होते, कविता : मंगेश पाडगांवकर . खसकन बाप ओढुनी घेतो , पुस्तक त्याच्या हातातले. "नकोरे वाचू ऐसे काही काय तुझेरे डोके फिरले.."? "बेटा ! जुन्या माणसांच्या रे, जुनाट असती या समजुती राघु -मैना , चिऊ- काऊ , ऐसे काही पक्षीचं नसती ! " "कुणी पाहिला मोर नाचरा..? कुणी ऐकले कोकीळ कुंजन..? जुन्या कल्पना, खुळ्या समजुती हे कवींचे .. केवळ fiction " "पुर्वीची ती माणसे पोरा खूप खूप मागास होती भाजी म्हणुनी खराखुरा पाला शिजवूनी खात होती " "भात म्हणुनी तांदूळ अख्खा शिजवूनी ते होते खात मुखात त्यांच्या होते म्हणे शुभ्र-शुभ्र बत्तीस दात " "आता कशी बघ आपण जेवण म्हणूनी खातो गोळी परी जेवित होते पूर्वज अपुले हातामध्ये घेऊन थाळी " "बाबा मजला सांगा कसे हो इंद्रधनु ते फुले आकाशी..?" बाप आपुल्या पोराची , समजुत काढी कशी बशी . "झोप आता पोरा गुपचूप रात्र खूप बघ आहे झाली . " असे म्हणूनी त्याने पोरा, झोपेची ती गोळी दिली . बाप लेकाचा हा संवाद, माय ऐकतसे कवतुके . ती ही वदली , " झोप रे सोन्या नको खाऊ रे त्यांचे डोके . " असे बोलुनी पोरा तिने, जरा -जारासे थोपटले . आठवुनी तिने कसे से , अंगाईगीत गाईले . नवरा वदे बायकोला मग, "नको गं ऐसे गीत गाऊ , लिंबोणीचे झाड अन्, चंद्र तयाला कोठून दाऊ . " पोर म्हणे, "बाबा.. बाबा गाऊ द्या ना तिला जरा , गोळीशिवायच येते डोळा शांत शांत झोप मजला ." "खर्च वाचेल गोळ्यांचा अन् पैसेही साठतील खूप साठलेल्या पैशातून आणु हिरवी हिरवी झाडे खूप " बोल ऐकुनी पोराचे , पाणावले नयन आईचे . टप टप टप टप गळू लागती , मोती भरल्या पाण्याचे . बघुनी पाणी डोळ्यांमधले पोर जरासे बावरते "आई तुझ्या डोळ्या मधुनी असे कसे गं पाणी गळते..?" माय म्हणे , "माझ्या पोरा, हा मायेचा वाही झरा , तुझ्या बोलाने रे सोन्या डोळ्यांनाही फुटला पान्हा...! "

याद्या 3325
प्रतिक्रिया 22

लेखनविषय:

भविष्यातल्या भीषण आणि भयंकर परिस्थितीचे भावोत्कट सादरीकरण... खूप छान असे तरी कसे म्हणू? _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

वा! बर्‍याच दिवसांनी कथावस्तु संदेश वगैरे असं सगळ काहि असणारी दीर्घ कविता वाचली.. आवडली :) कवितेच्या रचनेपेक्षा तीचा विषय आणि भाव प्रचंड आवडला..
कुणी पाहिला मोर नाचरा..? कुणी ऐकले कोकीळ कूजन..? जुन्या कल्पना, खुळ्या समजुती हे कविचे .. केवळ fiction
हे तर फारच छान!!! और भी आने दो! :) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

जबरदस्त. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

अप्रतिम कविता ... सुंदर आशय... खूप आवडली!

अप्रतीम कविता..! गोखलेसाहेब, ही कविता डायरेक्ट काळजालाच भिडली..! आपला, (फ्यॅन) तात्या.

खूप खूप जबरदस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल गोखल्यांचे खास अभिनंदन!! (माझे माहेर गोखलेच ना ;) ) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कवितेतील परिस्थिती कधी येऊ नये एवढीच इच्छा ! कविता सुंदर. :)

कविता आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

छान आहे कविता, आवडली! (अवांतरः कवितेत वर्णन केलेली परिस्थीती! यालाच डार्विनचा उत्क्रांतीवाद म्हणतात का?:))