Skip to main content

आंबा कोणता , देवगड की रत्नागिरी..

लेखक गोगट्यांचा समीर यांनी बुधवार, 07/10/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा... आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात . रत्नागिरी आणि देवगड .. बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा? मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही.. तर आपले यावर मत काय ? माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही.. चवीचा प्रश्न आहे हो !

(भैरवी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;) एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही 'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी, 'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले, रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही 'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला, घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही! चतुरंग
काव्यरस

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.

मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

लेखक दशानन यांनी मंगळवार, 06/10/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ५ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पाचवा पेग होवुन गेला आहे, समिक्षा सुरू आहे अशी स्वयंभु अवस्था.... अशातच पेग ६ ) मी - त्या हाटिलात गेला होतास का येवढ्यात... तो- नाय बा ! आपल्याला तिकडं झेपत नाही मी - का ? तो - अरे आपण साला मनात आला ते ओकणार.. तिकडे ओकायचे तर मनातल्या मनातच मी - अन तिकडे काय मनातले बोलत नाही काय ? तो - बोलतात की. मनातले बोलतात पण सगळेच नाही. बोलतात कमी आठ्या जास्त... मी -म्हणजे? तो - अरे इथे कसे आपण डिश आवडली तर जोरदार टाळी वाजवतो, झक्कास करुन आवाज देतो, अऽऽऽब्ब करुन ढेकर देतो. मी - हो...

येडा टिंब

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 06/10/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ...

पैंजण...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/10/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भीती वाटु लागलेय आजकाल.., माझ्याच पायातल्या पैंजणांची ! सदोदीत पाठलाग करणार्‍या.., त्यांच्या त्या किणकिणाटाची. खुप हौसेने घातलं होतं आईनं..., तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी ! वय वाढलं...., समज आली....., पण पैंजणांचा मोह सुटला नाही ! बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... पण आता मन मोहरत नाही..., आता थबकत नाहीत नजरादेखील...... राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्म
काव्यरस

बस....

लेखक मसक्कली यांनी मंगळवार, 06/10/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्णीय, मिसळपाव मित्रमण्डळी....हा प्रसन्ग रोज बर्‍याच मण्डळी सोबत होतो :B बस ने प्रवास करणारे लोक जास्त अनभवु शकतात... #:S स्टोप वर थाबुन रोज आपली बस यायच्या वाटेकडे डोळे लाउन पाहत आसतात्. : मग सुरु होते ती आपल्या बस शोधायची मोहीम...१ जाते २जाते जीव वैतागतो ~X( आनी बगता बगता सुरु होते ती खुन्नसेला... B) >:P बस दिसली की खुश होउन पुढे जातो .... :) पण्....जेव्हा कलते कि ती आपल्याला लागनारी बस नाही तर तिला आस तूच्छ लेखतो.. /:) नाही का... ;) >:) तर मित्र हो तुमी पन तुमचे अनुभव इकडे मान्डा... :) धन्यवाद...!!

भैरवी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 06/10/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
काव्यरस