Skip to main content

झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 06/10/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी आपलं माझ्या अंदाजाने आंतरजालावरिल पाकृनुसार बनवलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा...हा माझा पहीलाच प्रयोग असल्याने तुमच्या काही सुचना असतील तर नक्की कळवा... साहीत्यः २ पाउंड चिकन (अंदाजे १ किलो पण बोनलेस चिकन घ्यायचं नाही.) ३ मध्यम कांदे १/२ वाटी किसलेले सुके खोबरे २ टेस्पून तीळ १ टेस्पून खसखस ५-६ मिरे (खालील मसाले नसतील तर गरम मसालाही वापरता येइल पण चवीत फरक मात्र जाणवेल.) ५-६ लवंग २-३ इंच दालचिनी १ बडी इलायची २-३ छोटी वेलची १-२ तमालपत्र ३-४ लसूण पाकळ्या २ इंच आलं ४-५ चमचे लाल तिखट (मी +२ च

एक दोन तीन चार...

लेखक मिसळभोक्ता यांनी सोमवार, 05/10/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी मिसळपावाचा ट्र्याकर काय दाखवत होता ते बघा: एक सत्य दोन साधू तिसरा डोळा - विचार करा माहिती अधिकार चार वर्षाचा... पंचाक्षरी आकांत काय मजा आहे, नाही ? अशी सगळी शीर्षके गोळा केलीत, तर कवयित्री शारदा लिमये, यांची एक नितांत सुंदर नादमधुर कविता सहज उपजेल. चला तर, लिहा कविता !

कवितेतील सौंदर्य स्थळं

लेखक नंदू यांनी सोमवार, 05/10/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही दुखावणं हा या धाग्याचा उद्देश नाही. किंबहुना कवितेच्या व्याकरणाच्या आणि वृत्तांच्य्या क्लिश्टतेत न शिरता ढोबळमानाने तिची सौंदर्य स्थळं समजावून घेणं हाच आहे. आपल्या मिपावरील एका कवितेला मिळालेल्या प्रतिसादांकडे पाहता एकंदरीत ही कविता जवळ जवळ सर्वांनाच नादमाधुर्यामुळे आवडली आहे. नादमय रचना हे उत्तम काव्याचं एक लक्षण आहे हे मान्य पण केवळ नादमय शब्द रचनेमुळे कविता आवडली असं खरच म्हणता येतं का? असंच जर असेल तर कुठल्याही नादमय पण निरर्थक शब्द किंवा अक्षरांच्या रचनेला चांगली कविता म्हणावं का?

"याच साठी का केला होता अटटाहास".......

लेखक अनामिका यांनी सोमवार, 05/10/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ठाकरे बंधुंमधे जी वर्चस्वाची लढाई सुरु आहे आणि त्यानिमित्ताने विधानसभा निवडणु़कीत उमेदवारांचा प्रचार करताना उपलब्धहोणारे व्यासपिठ हा जणु एखाद्या तमाशातील फड आहे ..................व सभांना उपस्थित असणारी जनता ही फेटे उडवुन दाद देणारी व नेहमीच बारिला हजेरी लावणारे रसिकजन आहेत अश्या थाटात ठाकरे द्वयींचा कलगीतुरा सुरु आहे .......दोघांनी नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा सोडुन एकमेकांची उणिदुणि ,उखाळ्यापाखाळ्या,कुलंगडि बाहेर काढत तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेला व सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक करमणु़कीच साधन उपलब्ध करुन दिलय?आणि त्यांचीच गादी त्यांचे समर्थक म्हणवणारे देखिल चालव

दोन साधू ( रूपक)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 05/10/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
खलील जिब्रान वाचताना त्याच्या कथांमध्ये नक्की कायकाय आढळेल हे सांगता येत नाही. पण एक नक्की तो वाचकाला अंतर्मुख करायला लावतो. मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. मनाचे काने कंगोरे वेगळ्याच कोनातून दाखवून देतो. त्याची अशीच एक कथा एका टेकडीवर दोन साधू रहात होते. आपण त्याना मोठा आणि धाकटा अशी नावे देवू या. दोघे जण टेकडीवरच्या एका झोपडीत रहात होते.

एक सत्य

लेखक jaypal यांनी सोमवार, 05/10/2009 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी असाच संध्याकाळी मद्यालयात निवांत मद्यानंद घेत एकटाच बसलो होतो. त्या मद्यालयातील खांबांवरती आरश्याचे तुकडे चिटकवले होते आणि त्या तुकडयां मधे माझी असंख्य प्रतीबिंबे दिसली आणि ४ओळ्या सुचल्या...... टुटी फुटी ऐनक तेरी टुटे फुटे विचार एक सत्य नित्य है दिखे तुझे हजार
काव्यरस

राज ठाकरे यांचे समर्थन

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 05/10/2009 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक पिडीएफ आज मला विरोपाद्वारे आली आहे. गुगलड्~ओक्स वर मी ती अपलोड करून ठेवली आहे. ती इथे वाचा.

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 05/10/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला." मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे. तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.