लेखकविजुभाऊयांनी शुक्रवार, 23/10/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
डीस्क्लेमर : नाही प्रेरणांचा तोटा
जमेल तैसा हाणा गोटा
पचन
तू आणि तुझं पचन....
डीम-लॅम्पच्या प्रकाशात.. हॉटेलच्या जगात
गाववर भटकणारा तू...
एका हाताला वाफा येत असलेलं जेवण....
लेखककौतुक शिरोडकरयांनी शुक्रवार, 23/10/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
चपला बाकड्याखाली सरकवून पुजेचे ताट तिने हातात घेतले आणि ती मुख्य दरवाज्याकडे वळली. गेटच्या दोन्ही खांबाना असलेले नळ चालूच होते. आत शिरणारे सगळेच त्याखाली आपले हात-पाय धुवून पुढे सरकत होते. तिनेही तेच केले. पुढे चार पायर्या उतरलं की स्टीलच्या पाईपांनी तयार केलेले 'भुलभुलैय्या' होतं. त्यात शिरायचं आणि शेवटच्या टोकाला दर्शन. ते बालसदरात दाखवतात ना... या उंदराला चीजच्या तुकड्यापर्यंत नेणारा सरळ रस्ता कुठला ? मग हाती एखादी पेन्सिल वा पेन घेऊन सुरुवात करायची. हेही तसचं. हल्ली सगळ्या देवळात असते. जिथे असा प्रकार चालू ते देवस्थान जास्त गजबजतं. त्या देवळाची टीआरपी जास्त.
आज दोन ऑक्टोबर.
लेखककौतुक शिरोडकरयांनी शुक्रवार, 23/10/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
तू आणि तुझं वाचन....
टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात
नेटवर भटकणारा तू...
एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्या हाताने
पुस्तकाचा फडशा पाडणारा तू...
शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने
डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू...
कधी उताणा तर कधी पोटावर झोपून
हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू...
छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून
वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू...
प्रवासात मिळेल त्या जागेत
अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू.......
जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून
पानं उलटवणारा तू...
....
.....
नाना तर्हा.... नाना सवयी....
लेखकवेदश्रीयांनी शुक्रवार, 23/10/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते!) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध! टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो!) धडधड वाढली होती...
लेखकचेतनयांनी शुक्रवार, 23/10/2009 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही
:(
त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे
त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे
बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे,
भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे
भावांनी तोडली, जपावी, असली नाती,
नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
लेखकमड्डमयांनी शुक्रवार, 23/10/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या सामन्यातील अग्रलेख वाचला का?
नसेल तर पहा...
मराठ्यांचे पुन्हा एकदा 'पानिपत'- शिवसेना मुंबई
अखंड महाराष्ट्रासाठी राज्यात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याने काय खस्ता खाल्या हे कदाचित नव्या पिढीला माहीत नसावे, त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, त्यांना भगव्या झेंड्याचे तेज ठावूक नाही आणि म्हणूनच त्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचे काम केले आहे.
लेखकसहजयांनी शुक्रवार, 23/10/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
हा गणपा सांगून देखील नुस्ता तळतळाट करत राहील्याने व क्रस्टेशनच्या डिश बनवत राहील्याने मासा पाकृ मलाच द्यावी लागतीय. अरे पोट आणी कुल्ले फ्व्वाक्कन बाहेर आली तरी नुस्ते तळकट पदार्थ हाणताय तुम्ही सगळे. लेको जरा बनवा मी सांगतो ते पदार्थ. मग आवडती स्त्रीला आवडेल असे काही आवडते काम करु शकाल. खालच्या डीश मधे तेल वापरले नाही म्हणून इथे नमनाला दोन चमचे ;-)
बरं तर उत्तम मासे निवडायला लागणारी "साधना" नसेल किंवा तुमची आवडती "कोळीण" नसल्यास, तुमच्या आवडत्या मॉल / बाजारात जाउन फ्रेश सी फूड विभागातून तुम्हाला आवडेल असे ताजे कापलेले माश्याचे काप विकत घ्या. मी गुरामी नावाच्या माश्याचे काप घेतले आहे.
लेखकश्रीयुत संतोष जोशीयांनी शुक्रवार, 23/10/2009 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो,
कला क्षेत्रात अनेक महान व्यक्तिमत्व झाली.मग ते गायन , लेखन , अभिनय कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात पराकोटीची उंची गाठलेल्या व्यक्तींविषयी आपल्याला खचितच बोलायला , ऐकायला आवडतं. मला तरी नक्की आवडतं.
या धाग्यावर मला अशा आठवणी सांगायला आणि आपणाकडूनही ऐकायला आवडतील.
एक आठवण कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दलची आहे.
एकदा भट साहेब एका महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे होते. गायनाचा कार्यक्रम सुरु होता . गायिकाही मन लावून गात होती . भटसाहेबही दिलखुलास दाद देत होते.
लेखकचित्रायांनी शुक्रवार, 23/10/2009 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक विषय बरेच दिवस मनात घोळत होता, परवा प्रमोद देवांच्या एका चर्चेला लागलेल्या अवांतर वळणांमुळे परत मनात आला. झाले असे की प्रमोद देव यांच्या चर्चेत पुढे कधी मिपाचा दिवाळी अंक निघाल्यास त्यावर एखाद्या चित्ताकर्षक बाईचे चित्र असणार म्हणून संकेतस्थळाच्या संस्थापकांनी जाहीर केले.
खरे तर केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहिले तर अंकाच्या मुखपृष्ठाची गरज ही ग्राहकाला अंक आकर्षक वाटावा, त्याने तो विकत घ्यावा म्हणून असते. पण त्याचप्रमाणे अंकाच्या आत जो मजकूर असतो, अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.