Skip to main content

पीर पराई...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 16/10/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुणीदास पं जगन्नाथबुवा पुरोहित. हिंदुस्थानी गायकीतलं, आग्रा गायकीतलं, बंदिशीच्या दुनीयेतलं, तबलावादनातलं एक मोठं नांव. पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, मणिक वर्मा, पं रामभाऊ मराठे, पं भाई गायतोंडे यांसारख्या दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा! कठोर परिश्रम करून गाण्यावर हुकुमत मिळवलेले जगन्नाथबुवा! 'हम्म!

(विठोबा)

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 16/10/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्र झाली होती. वार बुधवार होता. सगळीकडे शुकशुकाट एक मांजर तेवढ्यात आडवं गेलं. दोन पावलं मागे सरकलो. आणि पुढे रस्ता चालू लागलो. एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं. कोणी तरी पेताड आपल्याच नादात गुणगुणत चाल्ला होता. दीर्घ श्वास घेऊन जीव हातात घेऊन मी नाकासमोर रस्त्याने चालू लागलो. चालता चालता मागुन आवाज आला. ''कुठं फिरु राह्यला बे भाड्या एवढ्या रात्री.'' कोणीच दिसत नव्हतं मंग ह्यो आवाज कुठून आला. दरदरुन घाम फुटला.

कोलंबी-बटाटा मसाला

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणपाशेठ, प्रभो, पांथस्थ,दिपालीताई इ. पासून प्रेरणा घेऊन आपणही आपली एखादी पाककृती लिहावी, असा विचार मनात आला. माझे स्वयंपाकाचे प्रयोग खरे तर केवळ निरीक्षणातून आणि स्वतःच्या चवीसाठी केलेल्या उचापतींमधून चालू झाले. लहानपणी आई-आजीने कधी कशाला हात लावू दिला नाही (आणि त्याबरोबरच अनेकदा 'आयतं गिळायला पाहिजे' वगैरे मुक्ताफळांचे सत्कारही केले), त्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहून त्या काय करत आहेत, याकडे लक्ष देणे; पाककृतींची पुस्तके वाचणे वगैरेपर्यंत उड्या मारल्या जायच्या.

तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर...

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 16/10/2009 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रेसिडेंट ओबामा (काहींच्या मते 'आमचे' प्रेसिडेंट) त्याना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्कारामुळे गाजत आहेत. खुद्द स्वतः ओबामांनाही धक्का बसला असेल त्याना नोबेल मिळाल्याचे ऐकून. असो, मिळाला एखाद्याला पुरस्कार म्हणून आपण कशाला जळा उगाचच. तर, आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर १. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) किंवा २. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल) वरील प्रश्नांच्या मधे 'किंवा' हा शब्द असल्याने २न्ही किंवा २ पैकी कोणत्याही १ प्रश्नाचे उत्तर देऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/10/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय? काँग्रेस(आय)चा लोगो हाताचा 'पंजा' आहे. महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे. असला लोगो हातावर मिरवणारे पोलीस निवडणूक आयोगाच्या 'आदर्श ??' आचारसंहीतेत चालतात का? अवांतरः महाराष्ट्र पोलीस चा लोगो कधी डिझाईन करण्यात आला?

पाऊस कधीचा पडतो

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 15/10/2009 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय डेब्ट म्युचल फंडात गुंतवणूक करण्याची संधी आपणाला असे वाटते आहे का कि सद्या समभागांच्या किंमती जास्तच आहेत व म्हणून शेअर बाजारात किंवा इक्वीटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. जर असे आपणास वाटत असेल तरीसुद्धा सद्याचे बँक ठेवीवरील अत्यल्प व्याज दर असताना व करपश्र्चात बँक गुंतवणूकीवरील अत्यंत कमी परतावा विचारात घेता आपण म्युच्युअल डेट फंडाचे योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर होऊ शकते.

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 15/10/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं ! अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू?