दोन कोल्ह्यांची (इसापनीतीबाहेरील) सुरस कथा!
मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय.
(१) रोनाल्ड रेगन यांची हॉलीवूडमधील एक अभिनेता म्हणूनची कारकीर्द कितीही अयशस्वी झाली असो, पण राष्ट्रपती या भूमिकेत त्यांनी जे आपलं अभिनयकौशल्य दाखविलं ते असामान्यच होतं असे म्हणावं लागेल. चेहरा 'सरळ' ठेवून इतकं धादांत खोटं बोलण्याचं त्यांचं प्राविण्य फारच श्रेष्ठ दर्जाचं होतं यात शंका नाहीं (त्याचा वापर भारताच्या विरुद्ध केला गेला म्हणून "कौतुकास्पद" म्हणवत नाही हे मात्र खरं!).
मिसळपाव