Skip to main content

बोलताना का सुचेना..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 23/11/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा.. सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा भासते का नित्य तेथे तीच शब्दऽ वंचना.. घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके त्याच जखमा आणि सार्‍या ओळखीच्या वेदना.. तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना.. का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना.. तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..! - प्राजु

काहि नाटके व आठवणी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
काहि नाटके व आठवणी.. आचार्य.....नावांचे नाटक आचार्य अत्रे यांच्या विरोधात लिहिले गेले आहे अशी कुणकुण लागली होति..नक्कि आठवत नाहि पण पहिला हिंवा दुसराच प्रयोग असेल..भरत नाट्य मंदिरला प्रयोग होता..

लो फॅट पनीर

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 23/11/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील पनीर वाल्या पाककृती पाहून खायचा मोह अनावर झाला तेव्हा मी शेवटी काही लो फॅट पर्याय शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी हे लो फॅट पनीर मिळाले. माझ्यासारखे पनीर पाहून नुसतीच लाळ गाळणारे कोणी मिपाकर असल्यास त्यांनाही उपयोगी पडेल म्हणून इथे कृती देतेय. साहित्य १६ कप १% दूध २ कप स्किम मिल्क पावडर १/३ कप व्हाईट व्हिनेगर कृती मोठ्या पातेल्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन गॅस वर गरम करायला ठेवा. उकळी आली की त्यात व्हिनेगर घालून नेहमी सारखे पनीर करा.

सुरक्षा ? ? ?

लेखक विनायक रानडे यांनी सोमवार, 23/11/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे.

होम लोन... मार्गदर्शन हवयं...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 23/11/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २० लाखापर्यंत होम लोन घ्यायचं असेल तर कोणत्या bank च घ्यावं... ह्या बाबतीत मला फारच कमी माहीती आहे... त्यामुळे मार्गदर्शन करा...

स्वप्न आणि सत्य !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
कधी उन्मादाच्या भरात तिला चंद्राची उपमा देतो विसरतो सोयिस्कररित्या… चंद्र.. तो स्वत:च शापित असतो ! कधी प्रेमाने तिलाही गंगेसम निर्मळ ठरवतो तिथली आत्मार्पणं पाहून… मी ही… शुद्धतेच्या व्याख्या विसरतो ! तुला चांदण्यांची फुले आणु? उत्साहाने स्वप्ने पाहतो … तुरडाळ शहाण्णव रुपये किलो? आम्ही दोघे… वास्तवाच्या चक्रव्युहात अडकतो ! विशाल.

सुप्त मनातील खजिन्याचा शोध घ्या!

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 23/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे. हे तंत्र म्हणजे नादोपचाराचे तंत्र. यात आपला मेंदू हव्या त्या अवस्थेत नेता येतो. मेंदूच्या या अवस्थांची गॅमा ४० Hz, बीटा (२०-१३Hz), अल्फा (१३-१०), थीटा (१०-४) व डेल्टा (४ - ०) अशी विज्ञानाने सर्वसाधारण वर्गवारी केली आहे. या अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळी कार्ये करतो. सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते.

प्रिझनर्स डिलेमा

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 23/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

मनसे यश: मिथ आणि वास्तव

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 23/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नविन पक्षाची घोषणा करण्यापुर्वी बराच वेळ घेतला होता. त्यामुळे ते नवीन काहीतरी भरीव अजेंडा घेउन येणार ह्या आशेने मी, सद्य स्थितीतील सर्व विचारशून्य आणि कर्तृत्वशून्य राजकीय पक्षांचा वीट आलेला, आनंदीत झलो होतो. मी राज ठाकरेंचा विद्यार्थीदशेपासून समर्थक आहे (आता.... होतो म्हणावे का?) परंतू ‘मराठी अस्मिता’हाच मुद्दा ‘जुनी दारु नवी बाटली’ असा पुढे आणल्यामुळे माझा काहीसा हीरमोड झाला होता.

दयाघना गणराया दे चरणी आसरा

लेखक मितालि यांनी सोमवार, 23/11/2009 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या यातानाना तुझाच रे सहारा दयाघना गणराया दे चरणी आसरा क्षणिक ही मोहमाया जीव असा जडावा जुळता तुटता नाती तूच रे आठवावा त्याचे डोळे आठवती पाहता रूप तुझे तुझ्या अशिर्वादा विन अधूरे स्वप्न माझे मनातील या भावना उमजाव्या तुला रे कृपासिन्धु गजानना तुझा धावा आता रे