Skip to main content

ई पुस्तके

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 22/11/2009 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
डाउन लोड केलेली ई पुस्तके वाचताना बरेच वेळा अधेमघे वा सुरवातिला पान कोरे सोडले असते.असे आढळले. व त्या वर "This page intentionally left blank " असे लिहिले असते त्याचे कारण कुणी समजावुन सांगु शकेल का?

मटर पनीर

लेखक माधुरी दिक्षित यांनी रविवार, 22/11/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : २०० ग्राम पनीर, पाव किलो मटार,१ मोठा कांदा , १ मोठा टोमैटो, १ चमचा आल-लसुण पेस्ट, १ मोठा चमचा काजुची पेस्ट, १ टीस्पुन काश्मीरी लाल मिर्ची पावडर, १ टीस्पुन गरम मसाला, तेल, १ मोठा चमचा अमुल बटर ,थोडीशी हळद, फोडणीसाठी थोड जिर, मीट चवीनुसार, ग्रेवीसाठी थोडे गरम पाणी. क्रुती : प्रथम कांदा उभा चिरुन तेलावर लालसर परतुन घ्यावा, कांदा लाल झाल्यावार त्यातच टोमैटोही चिरुन घालावेत हे दोन्ही परतुन गार झाल्यावर मिक्सवर त्याची पेस्ट करुन घ्यावी. पनीर थोड्या तेलात तळून घ्यावे, मटार वाफवुन ठेवावेत. कढईत थोडे तेल आणि अमुल बटर गरम करुन घ्यावे, त्यात थोडे जिरे आणि कांदा टोमैटोची पेस्ट तेल सुटेप

केळ्याचा शिरा

लेखक jaypal यांनी रविवार, 22/11/2009 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "अंजिर बर्फी" या पाककृतीस भरघोस प्रतीसादांची आपेक्षा होती पण ५३२ वाचने आणि केवळ ५ प्रतीसाद !!! ( बहुत बडी नाईन्साफी है/ पण म्हणुन काही--- जातो,चाललो ,माझं नाव काढा असा त्रागा करणार नाही) त्याच सदरात मी हे देखिल नमुद केले होते की अल्प प्रतीसाद आले तर दुसरी रेसीपी टाकिन. मंडळी मी दिल्या शब्दाला जागुन आता वचन पुर्ती करतो आहे . सादर आहे साधी, सोपी , पण पौष्टीक पाककृती "केळयाचा शीरा" साहीत्य १.

गोणेस्पोती राया - साष्टीमधील एका आरतीची चाल

लेखक धनंजय यांनी रविवार, 22/11/2009 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी मला गोव्यातील ख्रिस्ती समाजातील लोकगीतांच्या चालींचा खजिना आंतरजालावर सापडला. त्यातील एक चाल ओळखीची असणार म्हणून मागे दिलीच आहे - (आगे नारी - एक कोंकणी लोकगीत) गोव्यातल्या-कोकणातल्या लोकांना एकमेकांची ओळख आणखी एका बाबतीत पटते. बाकी कुठल्याही सणापेक्षा गणपतीचा उत्सव सर्वात लोकप्रिय आहे. दिवाळीला एखाद दिवस सुटी घेणारे लोक गणपतीसाठी आठवडाभर घरी जातात! पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांच्या पुस्तकात मला गणपतीच्या आरतीची एक चाल सापडली. (त्यांच्या लोकगीतांच्या पुस्तकात भक्तिगीते फक्त हिंदू देवदेवतांची आहेत.

अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)

लेखक Nile यांनी रविवार, 22/11/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील मिपा सदस्यांना कळावी हाच उद्देश.

बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही

लेखक प्रभो यांनी शनिवार, 21/11/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही... मराठी गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढल्याने आता बीएसई ने त्यांची वेबसाइट इंग्रजी, गुजराथी आणी हिंदी नंतर आता मराठीतही लाँच करायचे ठरवलेय. सर्व मराठी गुंतवणूकदारांना याने भरपूर सोय होणारे.......त्यांचे अभिनंदन....... राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसांचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ही वाचण्यात आले आहे. म टा धागा

फिश बिर्याणी

लेखक लवंगी यांनी शनिवार, 21/11/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईचे कायस्थी चिंबोरी कालवण पाहून मासे करण्याचा भलताच मूड आलेला. पण शोधूनहि चिंबोरी मिळेनात.. मग इथे मिळणारे मासे ( सामन आणी कोलंब्या ) वापरून काल फिश बिर्याणी बनवली. पहा बर मंडळी.. साहित्यः माश्याचे ५-६मोठे जाड तुकडे ( शक्यतो सुरमई, सामन असा घट्ट मासा घ्यावा ) ..

`एकच' तारा समोर आणिक...

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 21/11/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
meteor "सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले.

[मित्र]

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 21/11/2009 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर! आयडी नाही मिळाला तर लॉगिन होणारच कसे? प्रतिसाद नाही मिळाला तर वेळ जाणारच कसे? होईलच मिपा पूर्ण दंग्याशिवाय कसे? मग कंपू आपले अपूर्णच रंगाविना जसे संपादन- स्वोज्वळपणाचे हे सोंग त्यांना कळले नसेल नाही फुटणार ना रे बिंग आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.

मला हवी आहे चिल्टांच्या त्रासापासून मुक्ती

लेखक सानिका पटवर्धन यांनी शनिवार, 21/11/2009 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घरात फार चिल्टं झाली आहेत. काही लोकं ह्याला केम्र असे देखील म्हणतात. आकाराने एकदम छोट्या असलेल्या माश्या असे वर्णन करता येईल. फळे /भाज्या काहीही चिरले की लगेच त्यावर बसतात. कोणी सांगू शकेल का की ह्या त्रासातून कशी सुटका मिळेल. सध्या वास्तव्य अमेरिकेत आहे. त्यामुळे अमेरिकेत करता येईल असा उपाय सुचवावा.