Skip to main content

नशीब हे शिकलो - भाग ४१

लेखक विनायक रानडे यांनी मंगळवार, 24/11/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
त्या इजिप्शियन जोडप्याचे पहिले मूल असून सुद्धा दुसर्‍या मुलाच्या जन्माचा हा घोळ त्यांनी का घातला ? तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणूनच अपघाताने, कोणतेही नियोजन न करता देवाची कृपा समजून, बेजबाबदार रित्या बाळाला जन्म देणारे ९० टक्के पालक असतात असे संवेदनक्षम (१/११/२००९) ह्या लेखात लिहिले होते त्याचा हा एक धक्कादायक पुरावा. दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा तो दिवस होता, माझे जेवण संपत आले होते, बायकोचे अर्धेच झाले होते. तेवढ्यात माझ्या दारावर जोरात हात मारत इजिप्शियन मित्र ओरडून माझ्या बायकोला बोलवीत होता. त्याची बायको विचित्र अवस्थेत आहे व ति माझ्या बायकोची मदत मागते आहे.

(मी आणि (लेखांचा) पाऊस!)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 24/11/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: आमच्यात मुहूर्ताची वाट पहात नाहीत, त्यामुळे उगा बुधवार, शनिवार का करत बसा?
काव्यरस

मी कोण?

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 24/11/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी जेव्हा मला विचारलं आपण कोण! तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी! पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच कानी आला ओरडा देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद! अन तेव्हा मी म्हणलं मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक! तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है! तेव्हा मी विचार केला मी हिंदु असंच सांगण योग्य! पण तेव्हढ्यात कानी आला गलका घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र! मग मनी म्हणलं आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र! तोवर कुजबुज सुरु झाली सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी! मग मला आठवली जातीकरता खावी माती ही उक्ती!

राजे पुन्हा जन्माला या

लेखक रविंद्र गायकवाड यांनी मंगळवार, 24/11/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काय योगायोग पहा मागच्य २ दिवसात १०-१२ गाड्यांवर लिहिलेले वाचले "राजे पुन्हा जन्माला या." पहिल्या २-३ वेळा वाचले तेव्हा जास्त लक्ष दिले नाही म्हटले चला आपल्यासारखे अनेक शिवभक्त आहेत. पुन्हा २-३ वेळा वाचले तेव्हा मन शेखचिल्ली सारखे रम्य स्वप्नात रमून गेले..... अह्हाहा शिवचरित्रात वाचलेले चित्र डोळ्या समोर उभे राहिले. स्वराज्याचा प्रत्येक नागरिक राजनिष्ट आणि देशभक्त. आया बहीनी सुरक्षीत असतिल त्यांची छेड काढणार~यांचे हात कलम केले जातिल. प्रत्येक जण सकाळी देवपुजाकरताणा राजाच्या दिर्घायुष्याची प्रार्थणा करत असेल. राजांच्या एका हाकेवर देशभारातला सगळा तरून जीव द्यायला तयार होईल.

अप्पे आणि चटणी

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/11/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ,एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव,३/४ मिरच्या, ६ लसुण पाकळ्या ,१ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर मीठ चवीप्रमाणे... कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे करायला घ्यावेत.

दुधी भोपळ्याचे रायते

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/11/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : किसलेला दुधी भोपळा १ कप, गार दही २ कप( सायीचे असेल तर छान), बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा , बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा चमचा, जीरे पूड १ चमचा, चवीनुसार मीठ, साखर......... कृती : साले काढुन किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा. तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता.

तू तर माझी बायको, शारदा.....

लेखक भानस यांनी मंगळवार, 24/11/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

मी आणी पाउस

लेखक प्रभो यांनी सोमवार, 23/11/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली अशाच काही क्षणी येते आठवण तुझी माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं
काव्यरस