नशीब हे शिकलो - भाग ४३
मला व बायकोला पहाटे उठून दोन्ही मुलांना बघताना हसायला यायचे मोठ्याचा डावा तर लहानाचा उजवा अंगठा तोंडात असे, तसे छायाचित्र मी घेऊन ठेवले आहे. चलचित्र ग्राहकाचा ( व्हिडिओ कॅमेरा ) उपयोग व प्रयोग करण्या करता दोन्ही मुले व त्यांच्या दैनंदिन हालचाली व खेळ हे माझे विषय बनले. घरात येणार्या मित्रांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रीकरण करणे हा माझा अभ्यास व ध्यास होता.ह्यातून मला चग्रा(व्हिडिओ कॅमेरा)वापरण्याचा आत्मविश्वास मिळाला. मी व्यावसायिक कामे घेणे सुरू केले. दोन महिन्यात ५०० रियाल जमवले व ज्या अमराठी मित्राने चग्रा
घेण्यास मदत केली होती त्याला ५५० रियाल परत केले.
अर्थ माझा शब्दांचा
वाचक हो तुमच्या सोयी करता माझ्या ब्लॉग वरिल लेख मालिका इथे सुरु करीत आहे.
मी माझ्या कुवतीनुसार गेल्या ५५ वर्षात जे अनुभवले, त्यांमुळे मला उमजलेले शब्दांचे अर्थ, शब्दकोशातील अर्थ कोमेजलेली वाटतात.
अर्थ = शब्दांची समज, अर्थकारणात
अर्थकारण = सगळ्या खटाटोपाचे कारण अर्थ, पैसा गीळण्याची कला
सुख = दुसर्यास छळण्याचे, दूसर्यांनी माझ्याकडून पळवले, मी अजून चाचपडतो आहे
शांती = समजली तर नाहीतर दुर्मिळ प्रकार, नावाच्या व्यक्ती अशांत व अशांतता देणार्या होत्या
लेखक = बरेचसे लेखनिक, कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेले
कायदा = तुम्ही काय काय केव्हा कुठे आणि किती देणार ह्याची यादी
नियम = को
ट्रॉय
ट्रॉय खरतर एक शोकांतीका म्हणावी का शौर्य कथा असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अनुभवांपैकी एक असा अनुभव. हा चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक न राहता ह्या कथेतील एक पात्र बनुन जातो.रेवदंडा... माझं गाव
मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं...
लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...
मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो...
मुझे रात दिन.
मुझे रात दिन....तात्या साहेब आपण म्हणाल्या प्रमाणे हे गाणे मधुर नक्किच आहे..पण ते अस्सल नाहि ति नक्कल आहे ओ.पी. नय्य्रर साहेबांच्या गाण्याचि..ओरिजनल गाणे एक मुसाफिर एक हसिना या सिनेमातले आहे...
http://www.youtube.com/watch?v=7_k5y-QD7no
कृष्णकमळ
श्यामल सुंदरी
रूप मनोहारी
लोभस गोजीरी
हाय हाय !
ओठ ते मधाळ
पिकलं जांभूळ
आनंद कल्लोळ
चुंब चुंब !
सजल नयन
कमल कोमल
नासिका सरल
चाफेकळी !
अबोल अबोल
उमल उमल
हे कृष्णकमल
फुलेलना...?
विशेष
[गणिती सुत्रे]
प्राजूताईच्या सुंदर कवितेचे विडंबन तितकेच च्यालेंजिंग म्हणूनच ते आव्हान घ्यायला आवडते.
खरे म्हणजे हे विडंबन नव्हे -
अवघड सुत्रे, यम्म थ्रीतील
सांगती हे प्रोफेसर काळे
इंटीग्रेशन अन कॅल्कुलस
जाती डोक्यावर सगळे
एक्झामच्या गं बिकट दिवसा
अभ्यासाचे वाजले दिवाळे
बेंचवरच आता लिहून ठेवीन
येत नसे ते जे सगळे
जात पस्तिशी पुढे मजला
प्रवेश तिसऱ्या वर्षात मिळे
आई म्हणते, ’छान हो बाळा’
बाबांना मात्र कळते सगळे
बद्द वाजलेले नाणे माझे मग
खणखणीत वाजे गं साजणे
राहिले दोनच वर्षे आता गं
होतील क्लियर विषय सगळे
पहा जमतो का तुलाही
डिप्लोमा तरी कमीतकमी
आई नाहीतर हरकत घेईन
उधळेल स्वप्न आपले सगळे
काव्यरस
मिसळपाव
