Skip to main content

नमस्कार...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 06/01/2010 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कसे आहात सगळे..? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येतो आहे.. तूर्तास माझ्या आयुष्यात पुष्कळ काळी घटना घडत आहेत, घडल्या आहेत.. लाईफची एक बाजू खूप जवळून पाहायला मिळत आहे.. सगळी स्वप्न नसतात, वास्तवही असतं आणि ते खूप कटू असतं याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहे.. आणि कटू वास्तव भोगयला आपली चूक असावीच लागते असं नाही याचाही पुन्हा एकदा पुरेपूर अनुभव घेत आहे.. परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.. तूर्तास सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस फक्त मिपावर रहायचं म्हणतो आहे.. बाकी चालू द्या..

ती -२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 06/01/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता ती आणि रंग्याची (ती) वाचुन आम्हाला आमची झालेली फजि'ती' आठवली ती समीप माझ्या येते, खुणवुन जाते ती चक्क, गुलाबी रुमाल टाकुन जाते ती शिकवुन जाते अर्थ नवे नजरांना जागवते हृदयी भलत्या अन स्वप्नांना मग स्वारी अमुची तिच्या मागुन जाते ती गालांवर ओठांनी काढत रेषा तनमनी जागवी अशी अनामिक भाषा अन स्वारी अमुची पुरी मोहरुन जाते या गालांवरती पडले काहीबाही ते मणा सारखे मला भासते काही ती खडबडून मज जागे करुन जाते ती कुणी,कल्पना वा ना कविता माझी ती कजाग, फुगरी असे बायको मा

महाराष्ट्र विरुदध बिहार....

लेखक मी-सौरभ यांनी बुधवार, 06/01/2010 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवा १ बातमी वाचली की बिहार आता विकासाच्या गतीत देशात २र्या क्रमांकावर आहे. =D> हे वाचून मला खालील प्रश्न पडले :? १. ह्या प्रगतीचा महाराष्ट्रावर काय परीणाम होईल? २. इथले बिहारी परत जातील? ३. इथले उद्योग धंदे पण तिकडे गेले तर??? मिपाकरांना काय वाटतं????

माज्या इमान प्रवासाची बातमी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 05/01/2010 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. व्हय ही बात्मीच हाय नव्या वर्सात काय करायचं त्ये म्या ठरीवलच नव्हतं. डायरी बियरी ल्हिनं काय आपल्या जमत न्हायी. आन रोज काय ल्हायचं त्या डायरीत. सकाळी पोट साफझालं आज तीन विड्या ओडल्या. आज नानाची उधारी दिलप्या पडून पैशे उसने घीऊन भागवली आसं कायतरी पुळकाट ल्हिऊ? का...आज कारभारीन एकदम मस्त हासत हुती. तिने तिच्या भैनीचा इसारलेला झंपार न्येस्ला हुता. आस्लं ल्ह्यायचं आपल्याला न्हाय जमत आस्लं. रस्त्याने चालत रहाव चिच्चच्या झाडाला एकदम गाभुळलेल्या लै चिच्चा लागलेल्या दिसाव्यात. खीशात मिठाची पुडी अचानाक हाताला लागावी तसे काहीसे झालं.

(ती)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/01/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस

जगाला प्रेम अर्पावे

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 05/01/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली . मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेम

ती

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/01/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती समीप माझ्या येते, निसटुन जाते मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
काव्यरस

अंत:स्थ

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/01/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे.

दासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी - २०१० साठी प्रवेश

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 05/01/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
II श्रीराम समर्थ II
श्रीमद दासबोध अभ्यासक्रम
आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,अंतरीक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात.