मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ती समीप माझ्या येते, निसटुन जाते मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते

वाचने 4175 वाचनखूण प्रतिक्रिया 18

चतुरंग Tue, 01/05/2010 - 22:24
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते वा वा!! सुंदर कविता. (आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचता येईलच! ;) ) चतुरंग

jaypal Tue, 01/05/2010 - 23:22
दर्जा कविता. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

मेघवेडा Tue, 02/02/2010 - 22:38
दर्जा! वरचा क्लास!! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

In reply to by sneharani

टोळभैरव Wed, 01/06/2010 - 19:53
सूंदर...! मी टोळ. :) (मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

प्रभो Wed, 01/06/2010 - 13:38
नादलेस.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

उदय सप्रे Fri, 01/08/2010 - 11:52
क्रांतिताई, एकदम नादमय आहे ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! उदय सप्रे

मदनबाण Fri, 01/08/2010 - 19:53
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते व्वा... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

शुचि Tue, 02/02/2010 - 21:48
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ............ अलास!! लॉस्ट इन ट्रान्स्लेशन .... दॅट फीलींग!!! ...... अहाहा काय सुंदर कविता आहे क्रांती. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो

प्राजु Tue, 02/02/2010 - 21:55
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते क्लास!!! - प्राजक्ता http://www.praaju.com/

ऋषिकेश Wed, 02/03/2010 - 00:45
वा!! अप्रतिम!!! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.