Skip to main content

नमस्कार...

नमस्कार...

Published on 06/01/2010 - 11:37 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मिपाकरहो, कसे आहात सगळे..? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येतो आहे.. तूर्तास माझ्या आयुष्यात पुष्कळ काळी घटना घडत आहेत, घडल्या आहेत.. लाईफची एक बाजू खूप जवळून पाहायला मिळत आहे.. सगळी स्वप्न नसतात, वास्तवही असतं आणि ते खूप कटू असतं याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहे.. आणि कटू वास्तव भोगयला आपली चूक असावीच लागते असं नाही याचाही पुन्हा एकदा पुरेपूर अनुभव घेत आहे.. परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.. तूर्तास सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस फक्त मिपावर रहायचं म्हणतो आहे.. बाकी चालू द्या.. मिपा आपलंच आहे आणि त्याची काळजी माझ्यापेक्षा तुम्हा मायबाप मिपाकरांनाच अधिक आहे याची खात्री आहे.. पन्नासएक व्य नि आणि खरडी येऊन पडल्या आहेत. त्या सर्वांची नोंद घ्यायची आहे, उतरं द्यायची आहेत.. आंतरजालीय मराठी माणसांचा विजय असो, मराठी आंतरजालाचा विजय असो, मिपाधर्म वाढावा,जागवावा.. आपला, (फिनिक्स पक्षाची उमेद असलेला) तात्या.
लेखनप्रकार

याद्या 17371
प्रतिक्रिया 60

आंतरजालीय मराठी माणसांचा विजय असो, मराठी आंतरजालाचा विजय असो, मिपाधर्म वाढावा,जागवावा.. :) मी टोळ. :) (मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

गुड टू सी यू तात्या :) तात्या रॉक्स !! - (कधीतरीच हार्टली प्रतीक्रिया देणारा ) टार्‍या

तात्या गुड टू सी यू मॅन! नववर्षाच्या शुभेच्छा! सगळे सुरळीत होवो ही सदिच्छा!

तात्या, बरे वाटले. बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला इथे बघून खुप बरे वाटले तात्या. होतात कुठे? नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सर्व काही लवकरात लवकर सुरळीत होवो. मीपा तुमचा तणाव कमी करण्यात हातभारच लावेल तेंव्हा येत जा शक्य होईल तेंव्हा. मोहन

जिवनात अशा प्रकारची संकटे येतात व जातात. आमच्या सर्व मिपा कराच्या शुभेच्छा आपला तणाव कमी करण्यास मदतीला तयार असेल आपण पुन्हा प्रगट झाल्या बद्दल धन्यवाद आपला खोडकर संजीव

तात्या लिखाण पाहून बरे वाटलं वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

तात्या ...आम्ही नाही पण मित्रांकडे तरी मन मोकळ करा, भार हलका होइल चुचु

तात्या, हा कठीण काळ लवकर संपू दे. नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

तात्या बरेच दिवसानी आलात. गडबडी/ व्याप हे आहेतच. काळानुसार सगळेच मार्गी लागते. जगण्याच्या बर्‍याच बाजू आहेत. बरे वाईट प्रत्येक ठीकाणी असतेच. असो... बरेच दिवसानी दिसलात बरे वाटले.

आशां कालवती कुर्यात | कालं विघ्नेन योजयेत | तात्या हे ही दिवस जातील. सदिच्छा पाठीशी आहेतच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

असेच म्हणतो... शुभेच्छा कायमच पाठीशी आहेत. काळजी घ्या. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by प्रकाश घाटपांडे

असेच म्हणतोय तात्या. पुस्तकातून नाही तर व्यवहारातून ज्ञान मिळवलयं तुम्ही. कठीण प्रसंगा वर सुद्धा तुम्ही मात करणार या बद्दल शंका नाही.

तुम्हाला बघुन आंनद झाला. देव आहे सगंळ्यासाठी. देवाच्या दयेन बरे होइल सगळे.

ग्रेट टु सी यू !!! बरं वाटलं. (आर्डंट मिपाकर) सुमीत भातखंडे

तात्या तुम्हाला पाहुन बरं वाटलं.. :-) तुमच्या सगळ्या चिंता लवकरच दूर होवोत अशी त्या परमेश्वराला प्रार्थना.. -स्मिता

तात्या... तुमच्या लिखाणावरच्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचं सुकृत (goodwill) आहे. मिपाकर घरातल्यासारखं प्रेम करतात तुमच्यावर. खूप मोठं पुण्य आहे तुमच्या गाठीशी. आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर.... सगळं छान होईल !

श्री तात्या साहेब.नमस्कार..आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवुन आपल्या जिवनात..आनंद..शांति..प्रेम व सौख्य नांदो ..असे त्या दयाघनास साकडे....... अविनाश चटके सोसलेला...

छ्या, तात्या आंतरजालावर नाही म्हणजे काही मजा नाही साला. आज ऑनलाईन पाहुन, मनातले प्रकटन आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पाहुन बरे वाटले. सर्व काही सुरळीत होईल, काळजी घ्या व हिंमत सोडु नका. आमच्या सदिच्छा आहेतच सोबतील नेहमी. "आऽऽऽल इज वेल " हे गाणे गुणगुणा कधीमधी सहजच विरंगुळा म्हणुन ... ------ छोटा डॉन आमचे भांडण विठ्ठलाशी नाहीच, ते आहे त्याच्याभोवतीच्या दिडदमडीचे राजकारण न कळणार्‍या बडव्यांशी !

अरे वा!! तात्या तुम्हाला पाहून आनंद झाला! मिपावर आपले स्वागत आहे. मिपा आपलच आहे.;) रेवती

हा कठीण काळ लवकर संपू दे. आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवु दे.. आणी आमचे बिनधास्त मस्त तात्या आम्हाला लवकर परत बघायला मिळू देत.

In reply to by लवंगी

हा कठीण काळ लवकर संपू दे. आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवु दे.. आणी आमचे बिनधास्त मस्त तात्या आम्हाला लवकर परत बघायला मिळू देत. अगदी असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवंगीतै आणि श्री बिरुटेंप्रमाणेच म्हणतो. आपण ज्या विवंचनेत असाल त्यातून लवकर बाहेर पडू दे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

लवंगीतै, श्री. बिरुटे आणि अक्षय* प्रमाणेच म्हणतो..सदिच्छा !! *मी आणि अक्षयने एकमेकाना अरे-तुरे करायचे ठरवले आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळ परिक्षा घेत असतो. यावरून "मनाच्या श्लोकातील" थोडे वेगळे आठवले:
सदा सर्वदा देव सन्नीद्ध आहे | कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे || सुखानंद आनंद कैवल्यदानी| नुपेक्षीकदा रामदासाभिमानी ||
अर्थात, ज्याचे जळते त्यालाच कळते, या न्यायाने स्वतःच्या संकटातून जाताना जे काही करावे लागत असते, ते "अल्प धारीष्ट" म्हणणे "धार्ष्ट्याचे" ठरेल. पण एकदा का त्यातून बाहेर पडलो की जणू काहीच झाले नव्हते असे वाटते. जसे डोकेदुखी,दाढदुखीचे अथवा पायात काटा गेल्यावर काहीच सुचत नाही पण एकदा का ते दुखणे थांबले की असे काही झाले होते का, हे पण आठवावे लागते... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

व्वा तात्या, तुम्हांला पाहून फार आनंद झाला. एकंदरीत सध्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी विवंचना आहेत असे दिसतंय.. ग्रह नाराज असतील! काही मदत हवी आहे का?

दिस जातील दिस येतील, भोग सरल, सुख येईल. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

दिस जातील दिस येतील, भोग सरल, सुख येईल. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

तात्याभाय, वेलकम बॅक.. तुम्हाला परत बघुन लई आनंद झाला !! --टुकुल

तुमच्यावर आलेला कठीण काळ/संकट हे वैयक्तिक, खाजगी असेल तर सांगितलं नाही तरी चालेल. पण अश्या परिस्थीती उमेद कशी टिकवून ठेवलीत आणि कशी मात केलीत (ती तुम्ही करालच अशी खात्री आहे) हे प्लिज नक्की सांगा. आम्हालाही त्याचा उपयोग होईल. तुमच्यावर आलेला कठीण काळ हा लवकरच संपू दे ही प्रार्थना!

तात्या,मि.पा.वर आपल्याला बघून बरे वाटले.आपल्या आयुष्यातील कठीण काळ सरो व नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, आनंद,शांती,भरभराट घेऊन येवो हीच शुभेछा.

श्री रा रा तात्याराजेसाहेब, आपणास पुनश्च मिसळपावाचा आनंद घेताना पाहुन, मन प्रसन्न जाहले. महोदय, संकटे, अडचणी म्हणजे जीवनाचा अर्क, ते नसतील तर जगण्यात मजा ती काय? प्रत्येक अडचण तुमची ताकद वाढविण्यासाठी दिलेली पायरी असते, पायरी जेवढी उंच तितकी ताकद जास्त.. म्हणून लगे रहो. तुम्ही नसल्यामुळे बरेच दिवस मिपाचे मुखपृष्ठ कोरडे राहीले, आता तरी कोण्या लावण्यवतीच्या छायाचित्राने त्यावर बहार येऊदे. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

रातभरका है मेहमां अंधेरा किसके रोके रुका है सवेरा? जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या संकटांपासून उज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. क्रान्ति अग्निसखा

"परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.." ये हुइना बात/ देव दयेने आणि प्रभु कृपेने आपल्याला हे संकट पेलण्याची शक्ती नक्कीच मिळेल यात शंका नाही. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम आपल्या पाठीशी आहेत. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बरेच दिवस मिपावर मन लागत नव्हते. आज परत एकदा आपले लिखाण बघुन खुपच आनंद झाला. कटु अनुभवातुन जे काही शिकायला तुम्हाला मिळाले. ते अनुभवाचे बोल लिहा एकदा मिपावर. वेताळ

नमस्कार तात्या. बळ तुमच्याकडे आहेच, परमेश्वर आपल्याला योग्य रस्ताही दाखवो.

तात्यासाहेब, तुम्ही सुखरूप आहात यातच सारे आले. आता जरा आराम करा. तुमची उणीव मला तर भासलीच पण सगळ्यांनाच भासली. ही तुमची खरी पुण्याई! तुम्हाला मनःपूर्वक शुभाशिर्वाद. ------------------------ सुधीर काळे, Back to Jakarta on 6th! जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

तात्यासाहेब, तुम्ही सुखरूप आहात यातच सारे आले. आता जरा आराम करा. तुमची उणीव मला तर भासलीच पण सगळ्यांनाच भासली. ही तुमची खरी पुण्याई! तुम्हाला मनःपूर्वक शुभाशिर्वाद. ------------------------ सुधीर काळे, Back to Jakarta on 6th! जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

शेअर मार्केट ची बाजी कशी जिंकवी हे तुमच्या कडूनच शिकावे .. और वैसे भी हारकर भी जितने वाले को बाजीगर कहेते हैं ! :-) तुम्हाला पूर्ववत मिपा वर पाहून आनंद झाला ..Mipa was feeling Blue without You . ~ वाहीदा

या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.. एक्दम्बेष्ट! .....यालाच जीवन असे म्हणतात!

तात्या, पुन्हा तुम्हाला पाहून आनंद झाला. :)

मराठि आंतरजालाचा "सखा,मित्र्,संस्थापक आणि मह्त्वाचे "संवर्धक" तात्यासाहेबांस गणराया हजार बाहूंचे बळ देवो हिच प्रार्थना... हजार बाहू (समस्त मिपाकर) एक छोटा हित चिंतक

आम्ही आपणांस सुयश चिंतितो. अभ्यंकर परिवार. at and post : Xanadu.