Skip to main content

तुमच्‍या संगणकावर ऑफलाईन क्रिकेट स्‍कोर अपडेट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 07/01/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारत-बांग्लादेश-श्रीलंका यांच्‍यातील तिरंगी मालिका सुरू झाली आहे. श्रीलंकेविरोधातील कार्बोन कप मालिका जिंकल्‍यानंतर अति उत्‍साहाने मैदानावर उतरलेल्‍या भारतीय संघाला नवीन वर्षाच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात लंकेच्‍या नवख्‍या संघाकडून पराभव पत्करावा लागला. त्‍यामुळे मालिकेपूर्वी विजयाचा पक्का दावेदार समजल्‍या जाणा-या टीम इंडियाकडून अपेक्षाभंग होतो की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सामना डे-नाईट असल्‍याने ऑफीसमध्‍ये कामात व्‍यस्‍त असताना सामना टीव्‍हीवर पाहणे शक्य नसते.

गोलमाल है भाई सब गोलमाल है..

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/01/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख :२००३ सालच्या फेब्रुवारी महिन्याची. स्थळ :ठाण्याजवळची एक नविन सोसायटी. दुसर्‍या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये चार माणसं .तीन पुरुष .एक स्त्री. एका पुरुषाला बेडरुममध्ये पलंगावर बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवला आहे. स्त्री बहुधा नर्स असावी.पण पूर्णशिक्षीत नसावी. पलंगावर बांधून ठेवलेल्या माणसाच्या लक्षात आलं आहे की हे त्याचे शेवटचे काही श्वास आहेत. एकदा निकराचा प्रयत्न करून तो स्वत:ला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. त्या बाईच्या हातात एक सिरींज .त्यात पोटॅशियम क्लोराईड.

सबसे प्रेम करो...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 07/01/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
`हात मत लगाना'... पुढच्या बाकावरचा तो माणूस अचानक किंचाळल्यासारखा ओरडला. काहीसं ओशाळत शेजारच्या माणसानं त्याच्याकडे बघितलं. `अरे भैया, मै तो सिर्फ आपको तिकिट लेनेको बोल रहा हू'... तो समजावणीच्या सुरात म्हणाला, आणि शेजारच्या त्या संतापलेल्या माणसानं आणखीनच रागानं त्याच्याकडे बघितलं. `मै आगे यहीपें उतर रहा हूं'’... तो गुर्मीत म्हणाला. `फिर भी टिकट ले लो, और जहां चाहिये घूम लो'...

धर्मावर टिका करायला उच्च न्यायालयाची परवानगी...

लेखक विकास यांनी गुरुवार, 07/01/2010 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम्स ऑफ इंडीयातील या बातमी प्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धर्मावर टिका करण्यात काहीच गैर नाही मात्र याचा अर्थ द्वेष पसरवायला परवानगी आहे असा नाही अशा अर्थाचा निर्णय दिला आहे. आर. व्हि. भसीन नामक एका वकीलाने लिहीलेल्या इस्लामवरील पुस्तकात चुकीची विधाने केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यावर (तीन-चार वर्षांनी) बंदी घातली. त्याविरुद्धच्या सुनावणीच्या वेळेस हे सांगितले गेले.

मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी..

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 07/01/2010 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी cpmumbai09@gmail.com या पत्यावर तुम्ही इ-मेल करू शकता असं श्री. शिवानंदन यांनी कळवलं आहे. पोलिसांसंबंधी इतर माहितीसाठी www.mumbaipolice.org या संस्थळाचा उपयोग करावा असंही ते सुचवतात.

पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला..आज श्रीनगरमध्ये

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 06/01/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे. जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.

आठवण

लेखक प्रभो यांनी बुधवार, 06/01/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेचा विषय आमची 'ती'.......दुसर्‍या विषयावर कविता जमत नाहीत :) जाता दुरदेशी वाटलं होतं विसरेन तूला पण नुसत्या विचारानेच त्रासले मला नाही विसरू शकलो मी येते का कधी आठवण गं माझी? शेवटचे पाहिले तुला त्या दिवशी सोडवायला ही आली नाहीस तू वाट बघून वाट धरली मी प्रवासाची अशी का पाठवण केलीस गं माझी? पहिल्याच दिवशी पावसाने स्वागत केलं आठवली आपली पहिल्या पावसातली एकाच छत्रीतली सफर बसस्टॉपवरची पावसाने का पाठ सोडली नाही गं माझी? मनाची समजूत घालत फोन केला तूला आवाज ऐकताच मनातलं एक वादळ शांत झालं आणी दुसर्‍या शिडाला वारा भेटला या वेगालाही का कीव नाही आली गं माझी? आता थोडेच दिवस उरलेत इथे परत य
काव्यरस