जपान काही गमतीदार/बोलके किस्से
इंडोनेशियातील गमतीदार किस्सा मागे मि सांगितला आहेच, आता जपान मधिल काही किस्से.
२००२ ते २००५ अशी साधारण दोन अडिच वर्ष मि जपान मधे होतो, इंडोनेशिया पेक्षा भाषेचा प्रॉब्लेम जपान मधे जास्त होता. बहासा (भाषा या संस्क्रुत शब्दाचा अपभ्रंश) निदान लॅटिन लीपी मधे लिहिली जाते त्यामूळे निदान अर्थ समजला नाही तरी वाचता तरी येते, जपानी वाचणे म्हणजे सुरवातीला तर अशक्य कोटीतील गोष्ट होती.
मि आणि माझ्या बरोबर काम करणारा मनिश असे आम्ही शेजारी शेजारी रहायचो. जपानी घरे अत्यंत छोटी आणि कचकड्याची वाटायची.
एके रात्री ११ ११.३० ला मनिश ने मला जागे केले!
"नितिन, माझ्या रूम वर उंदीर आहे. सारखा खूड्खूड करत आहे.
मिसळपाव