आशावाद...

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
20 Mar 2010 - 3:43 pm

मागच्या अनुभवावरून
ठरवलं होते,
आता पुन्हा नाही...
हे आहे हे असच राहायचं...
पण ह्या चौकटी!
हे बंध!
हा आशावाद!!
करतात निश्चयाला दुबळे
कदाचित आता सगळे नीट होईल...
पुन्हा एकदा
घोटला गळा मनाचा
पुरून टाकली सगळी स्वप्ने
एक नवी सुरवात...
एक नवा आशावाद...

अनिरुद्ध अभ्यंकर

कविता

प्रतिक्रिया

II विकास II's picture

21 Mar 2010 - 10:13 am | II विकास II

>>पुरून टाकली सगळी स्वप्ने
स्वप्ने पुरुन टाकली तर आशावाद कसला?

विडंबनाला प्रतिसाद आले. पण मुळ कवितेला नाहीत.