Skip to main content

लवासा सिटि

लेखक धिन्गाना यांनी रविवार, 21/03/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षान्पुर्वि लवासा सिटिला गेलो होतो.देवड्या आणि चौक्याना तोन्ड द्यावे लागले.मोठ्या मिनतवारिने प्रवेश मिळाला.सहा गावे सम्पादुन हि सिटि तयार केलि आहे.किति गावकरि विस्थापित झाले असतिल कोन जाने.टेकड्या पायरि पायरि सपाट करत नवि फुलझाडे लाविलि होति.जुन्या व्रुक्शाना तिलान्जलि दिलि असेल.धनदान्डग्याच्या बोटिन्ग साठि नदि अडवुन पाणि साठविले आहे. पुढच्या लोकानि काय केले असेल?आता टाइम्स ओफ इन्डियमध्ये पर्यावरना वर लवासावाले व्याक्खान देत आहेत्.पर्यावरन्तज्द्न माधव गाडगिल ह्यान्च्याबरोबर बोलले. कोनि लक्श घालित नाहि. असो.

परवलीचा शब्द

लेखक देवदत्त यांनी रविवार, 21/03/2010 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या कथेत, अलिबाबाला त्या चाळीस चोरांच्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द कळला आणि त्याने आत जाऊन त्यातील फक्त हवे तेवढे सोने, दागिने स्वतःकरीता आणले. त्याचा भाई कासिम ह्याने गळ लावून अलिबाबाकडून त्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द मिळविला. गुहेत गेल्यावर आतील खजिना पाहून तो वेडाच झाला. त्यात तो परवलीचा शब्द विसरला आणि मग त्या चोरांच्या हाती लागून स्वतःचा जीव गमावून बसला. सर्वांना माहित असलेल्या कथेचा भाग संपला. अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो.

स्वयंसुधारणा

लेखक हेरंब यांनी रविवार, 21/03/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते. अपवाद फक्त, ' मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' असे म्हणणार्‍यांचा! तर सुरवात कुठून करावी ? उत्तम मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग, वाद, भांडणे, रुसवेफुगवे झालेले असतात. ते एकेक आठवून बघावे. रागाच्या भरात आपण कसे वागलो/बोललो ते आठवावे. तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर आणला की आपले वागणे तपासून बघावे. निपक्षपातीपणाने स्वता:स प्रश्न विचारावेत. १. चूक नक्की कोणाची होती ? २. समोरच्याची असल्यास ती आपण सभ्यपणाने निदर्शनास आणून दिली की त्याच्या वर्मावर बोट ठेवले ? ३.

रविवारची करमणूक.

लेखक रामदास यांनी रविवार, 21/03/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे . त्यातीलच ही एक चित्र मालीका . निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०. प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे. संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही. मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही. किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन

'स्रोत' का 'स्त्रोत' ? : मदत हवी आहे

लेखक दिपोटी यांनी रविवार, 21/03/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, सध्या एक लेख लिहीत आहे. तो लिहून झाल्यावर येथे प्रकाशित करीनच. त्याआधी एक मदत हवी आहे. इंग्रजीतील 'source' या शब्दाला मराठी समानार्थी शब्द हवा आहे ... माझ्या मते 'स्त्रोत' (strot असा टंकलेला) हा शब्द बरोबर आहे पण ओळखीतल्या एका जाणकाराचे मत 'स्रोत' (srot असा टंकलेला) बरोबर आहे. तेव्हा येथील जाणकार याचे निरसन करतील काय : 'स्रोत' का 'स्त्रोत' ? माझ्या मते 'स्रोत' चा अर्थ 'झरा' (म्हणजेच 'stream') असा होतो तर 'स्त्रोत' चा अर्थ 'source' असा होतो ... पण अर्थात माझे मत चुकीचे सुध्दा असू शकते. - दिपोटी

लुटा लुत्फ विसापुरचा अर्थात वाटा चुकत चुकत केलेल्या ट्रेकचा वग

लेखक झकासराव यांनी रविवार, 21/03/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये लोहगडला जाउन आलो. दुवा तेव्हाच विसापुर बघुन तिकडे जायच नक्की केल. पण ह्या ना त्या कारणाने ते पुढे ढकलतच गेल. मग एके दिवशी काही मित्रानी बाहेर जाउन खा खा खादाडी करण्याचा कार्यक्रम करुया का अस विचारल होत. त्यावर मी माझ्या वाढलेल्या ढेरीकडे बघत त्याआधी एक किल्ला बघुन येवु मगच खादाडी करु अशी एक "पोट"सुचना (:D) दिली. चारजण तयार झाले. आणि मग रविवारी सकाळी ७ चा मुहुर्त (मीच) ठर(व)ला. आणि मीच ७:३० ला निगडी चौकात गेलो. (पर्फेक्ट आयएसटी :D ) तिथुन निघालो.

स्त्री - पुरुष यांच्या मूळ लैंगिक प्रेरणांमधे भेद आहे ? ते समजून वाद कसे टाळता येतील ?

लेखक चक्रमवेताळ यांनी शनिवार, 20/03/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी डिस्कव्हरी वर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती.. त्यामधे दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी इत्यादीच्या नर मादी सहजीवनातील वैशिष्ट्ये दाखविताना तुलना अशी होती की - १. सामान्यतः कीटकांमधे .. उदा. मधमाशी, मुंगी इ. मधे मादी चे प्राबल्य असून नर मात्र प्रजोत्पादना पुरतेच असतात .. वंश सातत्याची प्रेरणा राखून मादी प्रजोत्पादन व पुढील कार्ये पार पाडते .. २. दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी तसेच सिंह , हत्ती , गवे इ. मधे एक नर अनेक माद्यांचा सहवास करतो आणी स्वतः चा वंश पुढे चालवतो....