मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वयंसुधारणा

हेरंब · · काथ्याकूट
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते. अपवाद फक्त, ' मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' असे म्हणणार्‍यांचा! तर सुरवात कुठून करावी ? उत्तम मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग, वाद, भांडणे, रुसवेफुगवे झालेले असतात. ते एकेक आठवून बघावे. रागाच्या भरात आपण कसे वागलो/बोललो ते आठवावे. तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर आणला की आपले वागणे तपासून बघावे. निपक्षपातीपणाने स्वता:स प्रश्न विचारावेत. १. चूक नक्की कोणाची होती ? २. समोरच्याची असल्यास ती आपण सभ्यपणाने निदर्शनास आणून दिली की त्याच्या वर्मावर बोट ठेवले ? ३. आपली असल्यास चूक प्रांजळपणाने मान्य केली की 'तुमचा काहीतरी गैरसमज होतोय' अशा टाईपच्या वाक्क्यांनी सारवासारव केली ? ४. वाद घालताना आपण आवाजावर ताबा ठेवला होता का ? ५. वाद मुद्याला धरुन चालला होता की भरकटला होता? आणि त्याभरात आपण समोरच्याची इतर उणीदुणी काढली होती ? ६. भांडण झाले असल्यास आपण शिवीगाळ केली होती का ? ७. नंतर त्या व्यक्तिशी आपण अबोला चालू ठेवला की पुढाकार घेऊन वाद मिटवला ? ८. जुनी भांडणे/वाद आपण विसरता की मनांत डूख धरुन ठेवता ? ९. आपल्याशी न पटणार्‍याचे वाईट झाले तर मनातून आनंद होतो का ? १०. यापुढील जीवनात असे प्रसंग आले तर आधीच्या अनुभवावरुन शहाणे होऊन आपण वेगळे वागू का ? यांत कुठेही आपण कायम पडते घ्यावे असे मला सुचवायचे नाही पण आपले मत ठामपणे पण समोरच्याचा अवमान न करता शांतपणे सांगता येते एवढेच मला सुचवायचे आहे. वरील १० मुद्दे आत्ता शांत मन असताना मला योग्य वाटत आहेत पण प्रक्षुब्ध मनस्थितीत यातले किती मला आठवेल व मी आचरणात आणीन याची अजूनही खात्री वाटत नाही. पण कमीतकमी त्या दिशेने प्रवास करण्याची मानसिक तयारी झाली आहे.

वाचने 1574 वाचनखूण प्रतिक्रिया 5

अन्या दातार Sun, 03/21/2010 - 20:28
बहुतेक मिपाकर मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' या टाईपचे असावेत. त्यामुळेच बहुदा कोणाचेच प्रतिसाद नाहीत ते!

शानबा५१२ Sun, 03/21/2010 - 20:41
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते. -----तो बदल दुस-यच्या नजरेतुन चांगला की वाईट ते महत्वाचे,स्वःताच्या नजरेत सर्वच बदल चंगले असतात रे,खासकरुन 'लालु'प्रसाद टाईपचे असे समजतात. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

अरुंधती Sun, 03/21/2010 - 21:42
हेरंब, सगळे मुद्दे विचार जरी करायला लावणारे असले तरी त्या मुद्द्यांवर विचार करायची तयारी व मानसिकताही निर्माण व्हायला हवी. सर्वात बेस्ट म्हणजे नव्या दिवसाची नवी पाटी! पण तेही सर्वांनाच शक्य होईल असे नाही. वाद झाल्यावर बहुतेकजण समोरची व्यक्तीच चूक कशी होती/आहे ह्याबद्दल विचार करण्यात, समर्थन करण्यात अधिक वेळ घालवतात. पण तोच वेळ आपण आत्मपरिक्षण करण्यात घालवला तर त्याचा आपल्यालाच फायदा आहे!! शेवटी स्वप्रयोग झिंदाबाद! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

शेखर काळे Mon, 03/22/2010 - 12:12
शांतपणे सांगून कोणी तुमचे ऐकले आहे काय ? जोपर्यंत माझा आवाज समोरच्या माणसाच्या आवाजापेक्षा मोठा नसेल तोपर्यंत मला त्याचेच ऐकून घ्यावे लागणार. - शेखर

विसोबा खेचर Mon, 03/22/2010 - 18:16
अपवाद फक्त, ' मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' असे म्हणणार्‍यांचा!
आम्ही त्यातलेच! :) तात्या.