Skip to main content

निकालाचा शोध...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 24/03/2010 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. अभ्यासाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल बरेच 'शोध' लागतात असे आढळून येतं. तो निकाल 'result ' असेन तर बऱ्याच जणांना अमानवी शोध लागल्याचे बोलले जातं. त्यातील बऱ्याच जणांना असा शोध लागतो की त्यांनी दररोज १६ ते १८ तास अभ्यास केला होता. आता हा असला अभ्यास अमानवीच म्हणावा लागेन, नाही का? अहो मानव म्हटला तर त्याला ६-८ तास झोप पाहिजे, एखादा तास जेवणास लागेल, बरं विद्यार्थीदशा म्हटली म्हणजे फिरणे (हुंदडणे) आलेच.

अरुनाचल...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 24/03/2010 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
अरुणाचलचा दौरा संपला। प्रवास, प्रवास अणि फ़क्त प्रवास! तब्बल ८ राज्य, १७ नद्या (गोदावरी, वर्धा, महानदी, संख, गंगा, ब्रह्मपुत्रा,लोहित), दक्खनच्या पठारावरून सातपुड्याच्या दक्षिणेकडून दंडकारण्य, मग छोटा नागपूर करून गंगेचे विस्तीर्ण मैदान, अहोमच्या पुण्यभूमीतून अरुणाचल गाठले! एकंदर प्रवास ९००० कि.मी. चा... १५ दिवस... १२ वीर..

आजीची भातुकली

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 23/03/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात. पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत.

२१ मार्च - जागतिक कवी दिनानिमित्त - महाराष्ट्र टाईम्सच्या "शब्दांचीच रत्ने" या अग्रलेखामधून संपादित.

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 23/03/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबादला आल्यापासून म्हणजे गेली जवळ जवळ १४ वर्षे मराठी वर्तमानपत्राशी संपर्क नाहीच म्हटले तरी चालेल. अधून मधून जेव्हा डोम्बिवलीला आई वडिलांकडे जातो तेव्हा महाराष्ट्र टाईम्स वाचतो तेवढाच. आई मात्र जर काही वाचण्यासारखं असेल तर हमखास कात्रण ठेवते किंवा नोंद करून आणते. तसच या वेळेस तिने आणली नोंद "शब्दांचीच रत्ने" या महाराष्ट्र टाईम्स च्या अग्रलेखाच्या संपादित भागाची. तोच संपादित भाग खाली देत आहे. जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.

मराठी - हिंदी जुगलबंदी!

लेखक रेवती यांनी मंगळवार, 23/03/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुलीमामीच्या मुलीनं, स्नेहानं परप्रांतीय मुलाबरोबर जमवलं आणि घरात हलकल्लोळ अजिबात झाला नाही.

मेरा रंग दे बसंती चोला

लेखक बेभान यांनी मंगळवार, 23/03/2010 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज २३ मार्च भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा ७९ स्मृतीदिन. भ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन...इन्किलाब जिन्दाबाद.. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. ’लिजंड ऑफ भगतसिंग’ मधील हे ए. आर.

सुमनताई

लेखक दिपक यांनी मंगळवार, 23/03/2010 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. "देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली...." आई पलंगाला डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं काय झालं. ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच. मोठ्या काकांची मुलगी सुमन माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी होती.

हिटलरची प्रेयसी - इव्हा ब्राऊ

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 23/03/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
इव्हा ब्राऊ हिटलर ची केवळ रखेल होती. तिची आणि हिटलर ची भेट हेनरिच होपमन घरी १९३० च्या सुमारास झाली होती हेनरिच होपमन हां हिटलर चा छायाचित्रकार होता. इव्हा ब्राऊ चा हिटलरशी झालेला परिचय हे गेली राउबल आत्महत्येचे एक कारण असावे. इव्हा ब्राऊ ही साधी,बेताची आकर्षक मुलगी होती. हिटलर आपल्याला सोडून देईल की काय अशी तिला नेहमी भीती वाटत असे. हिटलर ने तिला धूम्रपान करण्यास आणि नृत्य करण्यास बंदी केली होती. हिटलर जरी तिच्याकडे दिवसेंदिवस अक्षम्य दुर्लक्ष करीत असे, तरी तो तिच्याबाबतीत मत्सरी होता.तिची कुत्रा पाळण्याची साधी इच्छा ही त्याने मानली नाही. तिची दैनंदिनी सापडली आहे.