ज्येष्ठ आषाढ
ज्येष्ठ आषाढ
.....
कधि बसतो
लगबग उडतो
एक थवा
.
थयथयते
मग ना दिसते
वीज लता
.
दुमदुमतो
कधि गुरगुरतो
ढग काळा
.
थबथबली
अवजड करडी
स्तब्ध हवा
.....
उन्हाळ्याची तयारी
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते.
म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे.
कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!
अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्,
किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.
सावध ऐका (मागल्या) हाका!
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.
[खिंड]
|| विनायक प्रभू प्रसन्न ||
हॉल क्रमांक पाच.
वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा
पेपर इंग्रजीचा.
मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या.
पहिला तास सहज निघून जातो.
सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली.
मास्तर कॉप्या काढून घेतात.
वर्गात थोडीशी हालचाल.
पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु.
शेवटची पाच मिनिटे.
एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली.
मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या.
आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली.
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
''तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या''
''सर, सर्वच पोरं नकला करतात.एकही अक्षर...
एकाएकी कुठून कैशी
कल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती
अजाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
रविकुहरातील बनुनी छाया
सरसावुनी मग येई रावा
मरुभूमीकणघृत रगडाया
जराजीर्ण त्या जरासंध-सम
लचके समस्त एकवटाया
नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा
शब्दार्थ -
विहरी - विहरण करतात
क्षत्रपती - पृथ्वीपती
घृत - तेल
प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीत
कुंग फु पांडा
आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो.
बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.
'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.
बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.
'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.स्मार्टफोन : मदत हवीय
नमस्कार मित्रहो..
आपल्या मिपावर बर्याच तंत्रज्ञ मंडळींचा वावर आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असलेल्या आपल्यासारख्या तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.
मी सध्या नोकिया ६२७० हा भ्रमणध्वनी वापरीत आहे.
सध्या त्याची प्रकृती बरीच खालावली असल्याने मी सध्या एका नवीन भ्रमणध्वनीच्या शोधात आहे - जो 'स्मार्टफोन' (Smartphone) ह्या वर्गात मोडणारा असला पाहिजे.
मला खालील सुविधा असणारा 'स्मार्टफोन' हवाय:
१. टचस्क्रिन+की-बोर्ड (Full QWERTY tactile keyboard + Full QWERTY onscreen keyboard) - नुसता की-बोर्ड असेल तरी चालेल पण डिसप्ले-स्क्रिन बर्यापैकी मोठा हवा
२. वाईड स्क्रिन डिसप्ले
३.
मिसळपाव