Skip to main content

आरसा अथ ते इथी

लेखक झुम्बर यांनी शनिवार, 24/04/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी खूप मजा यायची त्याच्या मध्ये डोकावताना मीच स्वताचे पाहुनी बोळके हसायची रडता रडता मग मी थोडी झाले मोठी आरसा परी तोच होता गणवेशातले रूप वाढते तोही अलगद निरखत होता मग मी चढले शिडी नाजुकशी तारुण्याच्या उंबरठ्यावरी आणि सर्वांगावर माझ्या शृंगाराची फिरली नक्षी आरसा..... मग माझा सखाच झाला संवाद तासन तास झडू लागला नित्य नवा साज बहराचा अंगांगी माझ्या उमलू लागला मग ती मोहक वेळ आली आयुष्याच्या वळणावरती साद कुणी ती घालून हळवी मोहविले मज मनी मानसी आरसा .... नित्य सख्या स्तव सजता सजता आरसा कानी सांगतसे आज चढव हा साज नवा तोच सख्या मोहवितसे चालुनी मग ती सप्तपदी झाले सात जन
काव्यरस

भेट आभाळांची..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 24/04/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज सचिनचा वाढदिवस.. सर्वप्रथम त्याला सार्‍या मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना.. इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. त्याकरता मॉर्गनसारखे दिग्गज समर्थ आहेत.. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल..

अनुभव: अनोळखी आपुलकी

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी शनिवार, 24/04/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
(मी मूळचा रहाणारा नांदुर्‍याचा! मी काही काळाकरता कोकणात गुरांचा डॉक्टर म्हणून नोकरीला होतो. आता रिटायर झालेलो आहे.त्यावेळी मला आलेला एक आपुलकीचा साधा अनुभव येथे सांगतो.) ते होते १९६५ साल. जुलै महिना. चौदा तारीख. कोकणात गेल्या सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता... पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. रात्रीचे दहा वाजले होते. मी झोपण्याच्या तयारीत होतो. तोच दारावर थाप पडली. "डॉक्टर साहेब आहेत काय?" मी दरवाजा उघडला. समोर ५-६ जण उभे होते. एकाच्या हातात गसबत्ती होती. सर्वांच्या अंगावर घोंगड्या होत्या. मांडीला अर्धे धोतर. "आत या!" सर्वजण घोंगड्या झटकून आत आले.

तिरिछ

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी शनिवार, 24/04/2010 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान होतो तेव्हा प्रश्नांची वारुळे उभी राहत. एकाभोवती अनेक. बसचा कंडक्टर इतके पैसे जमा करतो म्हणजे तो खूप श्रीमंत असावा का? माझे वडील कंडक्टर का नाही होत? परिवहन महामंडळाच्या जलद गाडीतून जातांना आमच्या छोट्याशा गावासमोर बसस्थानक असूनही बस का नाही थांबवत? आमच्या वाड्यासमोरच्या घरात कोण बाई आहे जिच्यापासून सर्व लांब राहतात? चिंचेच्या झाडाखाली भूत आहे ते कोणी पाहीले आहे का? भूत असूनही समोरच देशपांड्यांच्या वाड्यात लोक कसे राहतात? त्यांना भीती वाटत नाही का? अनेक प्रश्न. कधी कोणी काहीतरी सांगे. त्यातून अजुनच प्रश्न पडत. तसे माझे बालपण चारचौघांसारखेच होते. खूप कमी वेळा त्या जगात जावेसे वाटते.

शंकर (जयकिशन) यांची पुण्यतिथी- पुण्यात अनौपचारिक मैफल

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शनिवार, 24/04/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २६ एप्रिल रोजी श्रेष्ठ संगीतकार शंकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज संध्याकाळी पुण्यात माझ्या एका परिचितांच्या घरी एक अनौपचारिक मैफल आयोजित करण्यात आली आहे. शंकर- जयकिशन विषयी थोड्या-बहुत गप्पा, हौशी एस्.जे फॅन्सचे गायन वा वादन असे काहीसे स्वरूप असेल. अश्या प्रकारची मैफल त्यांच्या घरी अठ्ठ्याऐंशी सालापासून (शंकरच्या निधनाच्या पुढिल वर्षापासून) होत आहे. इच्छूकांनी माझ्याशी व्य नि वा मोबाईलवर संपर्क साधावा. सर्व जुन्या हिंदी गाण्यांच्या व शंकर- जयकिशनच्या फॅन्सना हार्दिक आमंत्रण!

माझाही 'सर्पानुभव'

लेखक वर्षा यांनी शनिवार, 24/04/2010 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज मीनलताईचा सापावरचा लेख वाचला आणि माझ्याही सर्पानुभवाच्या स्मृती जाग्या झाल्या. त्याविषयी मागे लिहिलं होतं तेच इथे परत देतेय. :)
************
अनुभव गाठीशी जमावा म्हणून केलेल्या नोकर्‍याच कधीकधी आपल्याला काही अविस्मरणीय अनुभव देतात. साडेपाच कधी वाजतायत याकडे डोळे लागलेले असायचे त्या चाकरमानी कालखंडातलीच ही गोष्ट. तेव्हा एका जपानी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी भाषांतरकार/दुभाषी म्हणून नोकरी करत होते. यंत्रसामुग्री तयार करणारी ती एक इंजिनीयरींग कंपनी होती.

वाढदिवस

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 24/04/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यातील गोष्ट, मुलाच्या शाळेतील बाई त्याची तक्रार सांगत होत्या. "तुमचा मुलगा ऐकत नाही. चित्रात मी सांगीतलेले रंग न वापरता दुसरेच रंग वापरतो. शीकवताना बोलत असतो, पण त्याच्या शेजारच्या मुली शांत असतात (मग हा बोलतो तरी कुणाशी?). मी सांगीतल्या प्रमाणे न करता, सर्व गोष्टी आपल्याला पाहीजे त्या पद्ध्तीने करतो." घरी आई सांगत होती, "सकाळी उठायचा कंटाळा करतो, खुप वेळ बाथरुम मध्ये बसतो, अर्धा तास लावतो नष्टा करयला. त्याला हवे तेच कपडे घालतो. स्वेटर/जॅकेट घालत नाही.

तात्यांना पाठींबा

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 24/04/2010 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांना पाठींबा सध्या मिसळपाव वर जो आजची खादाडी या सदरावरून वाद सुरु आहे, तो मनाला अतिशय क्लेशकारक, आणि वेदनादायी वाटला. तात्या अभ्यंकर यांना मी व्यक्तीशः ओळखत नाही, मात्र गेल्या 3 वर्षाहून अधिक काळ मी त्यांचा वाचक आणि चाहता आहे. मिसळपाव च्या रूपाने त्यांनी आपल्यासमोर हे एवढे मोठे कार्य उभे केले आहे, ते निशितच कौतुकास्पद आहे. मराठीत अनेक वेब साईटस आहेत; मात्र मिसळपाव ची सर कोणालाही नाही. यात सदस्यांचा वाटा मोलाचा आहेच, मात्र तात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळेच आपण स्वताला इतक्या मुक्तपणे आणि मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो; आणि ही बाब आपण कदापि विसरता कामा नये.

..उखाणे (काहीच्या बाही)..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 24/04/2010 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा स्पेशल उखाणे कृपया हलकेच घेणे. इथे मी व्यक्तिशः कुणालाही ओळखत नाही. फक्त आय.डींच्या व्यक्तिमत्वा नुसार हे उखाणे लिहिले आहेत. सौ.मि.पा संपादक. पंचांगात पंचाग..आहे पंचांग दाते.. *** रावांनी ब्लॉक केले माझे डुप्लिकेट खाते.. सौ.तात्या दाराबाहेर काढुन ठेवते मी नेहेमी माझे खेटर.. तात्याराव मारतात मला रोज रोज फाट्यावर.. सौ.देवकाका. कधी हे करतात तर कधी ते करतात.. प्रमोदराव आजकाल चाल हे अस्त्र फेकुन मारतात.. सौ.मिपाकर घाटामध्ये कोसळते पावसाळ्यात दरड.. ***राव करतात मला घरामध्येही खरड.. सौ.टारझन..
काव्यरस

साठीतलं "झपाटलेपण"!

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 23/04/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल? माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो. सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..." गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मी सुहासला ओळखतो.