(भक्ता! तू सुद्धा ???)
प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे.
टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली,
भक्ताला बिलकुल अटक नाही झाली.
मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला.
पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!
मिसळपाव