Skip to main content

गझलचे छन्द्शास्त्र...

लेखक प्रदीपा यांनी मंगळवार, 13/04/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर गझल वर बरच काही वाचायला मिळाले... मनात आल, आपल्याला माहीती असलेल बा़कीच्याना ऐकवाव. नाहीतरी समर्थ सान्गुन गेले आहेत ..जे जे आपणासी ठावे, ते ते दुसर्याशी सान्गावे, शहाणे करुन सोडावे - सकल जन... तर... असो!... आता जरा ह्या शेराकडे लक्श द्या. ' तोच रस्ता त्याच वाटा, चालतो आहे नव्याने .. तीच दु:खे, त्याच जखमा सोसतो आहे नव्याने' .....कसा आहे? अजुन एक पहा.... ' रस्ता असा मिळाला कोठेच झाड नव्हते, माझ्याच सावलीवर आता विसावतो मी' अथवा... ...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी . आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...' जबरदस्त आहे ना? ....लोकहो, गैरसमज नको...

स्नान

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/04/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचे स्नान ह्याचे नाना प्रकार आहेत...काहि लोक रोज सकाळी अंघोळ करतात तर काहि संध्याकाळी..काहि ना गरम पाण्या शिवाय होत नाहि तर काहि गार पाण्याने अंघोळ करतात... मला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडति... पुण्याला होस्टेल मधे रहात होतो त्या वेळी गरम पाणी हि चैन होति..त्या मुळे वेळ मिळेल तसा गार पाण्याने स्नान करायचो... कारखान्यात कामाला होतो त्या वेळी शॉप फ्लोअर वर काम असायचे ..अंगावर ऑइल, चे सुक्ष्म फवारे उडायचे..ग्रिज, सा~याने आंग अंबुन जायचे म्हणुन कामावरुन सुटलो कि परत आंघोळ करुन फ्रेश व्हायचो... माझ्या पहाण्यात असे बरेच स्त्री पुरुष आहेत जे १२ महिने गार पाण्याने स्नान करतात... आपली स्नानाच

माणुसकी

लेखक मानस् यांनी सोमवार, 12/04/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ऑफिसला येतानाच प्रसंग, साधारण ११-११:३० ची वेळ होती. ट्राफिकचा त्रास नको म्हणून मी मुद्दाम थोडया बाहेरच्या रस्त्याने बाईकवरून निघालो होतो.उन प्रचंड होतं. थोडं पुढे आल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्याच्या कडेने एक वृद्ध जोडपं चालताना दिसलं.दोघेही खूप थकलेले होते.अंगावर जुने मळके कपडे,आज्जीबाईच्या हातात कसलस एक गाठोडं.आजोबांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हाताने आज्जीबाईना आधार दिलेला.मी क्षणभर मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं,घामाने थबथबलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजून मला स्पष्ट आठवतायत, मनात विचारांचं काहूर उठलं.कोण असतील हे ?

मोबाईल घेण्यासाठी मदत हवी आहे

लेखक वेडा कुंभार यांनी सोमवार, 12/04/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, मला थोडी मदत हवी आहे. मला एक टच स्क्रीन मोबाईल घ्यायचा आहे. माझे बजेट ७००० ते ८००० आहे. मला तीन फोन आवडले आहेत, पण त्यातला कोणता निवडू ते कळत नाही आहे. तुमच्या सारख्या तज्ञ लोकांची मदत अपेक्षित आहे. १. नोकिया ५२३३ २. samsung corby ३. LG Cookie पेप जर ह्या व्यतिरिक्त एखादा चांगला फोन असेल तर ते सुद्धा सांगू शकता.

भटकंती निळकंठेश्वर परीसराची

लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 12/04/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असुनसुद्धा आपल्याला माहित नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहित होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "निळकंठेश्वर".

अपव्यय

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/04/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राने खार्‍या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात करण्याचे रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे वाचले होते. त्यावेळी देशी तंत्रज्ञांनी यश मिळवल्याचा अभिमान वाटला होता. पुढच्या काळातील पेय जलाच्या टंचाईवर उत्तम उपाय असे जाणवले होते. नंतर त्यांनी हे तंत्रज्ञान अल्प किंमतीत खुले करून दिल्याचेही वाचले होते. या तंत्रात एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या पडद्यातून (Membrane) खारे पाणी पास केले जाते पाण्यातील क्षार त्या पडद्यातच राहतात आणि गोडे पाणी पलिकडे जाते. नंतर त्या पडद्यात अडकलेले क्षार 'धुवावे' लागतात.

"रेड सन"

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 12/04/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीचा प्रसंग. मुंबईला गेलो होतो. मस्त कलंदरकडं जायचं होतं. निखिल देशपांडेही आला होता. मकीच्या घरात प्रवेश केला, अन् उजव्या हाताच्या ड्रेसिंग टेबलवर लालभडक रंगाच्या पुस्तकानं लक्ष वेधून घेतलं: "रेड सन - ट्रॅव्हल्स इन नक्षलाईट कंट्री"! मला एकदम काही दिवसांपूर्वी निखिलशी या पुस्तकाविषयी झालेलं बोलणं आठवलं. पुढं फारसं काही घडणार नव्हतंच. परतीच्यावेळी माझ्यासोबत ते पुस्तक होतं. :) *** नक्षलवाद. रेड कॉरिडॉर. माओवादी. चीन-नेपाळ. आदिवासी. विकास. दुर्गम प्रदेश. सलवा जुडूम. रोजची मृत्यूशी लढाई. क्रौर्य.

खट खट, खट खट, खटक!!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 12/04/2010 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक बातमी वाचली. मुंबापुरीची. एका मध्यमवर्गीय वस्तीत घडलेली. झाल काय; एका घरा समोर पत्रे येऊन पडू लागली. मजकूर घरच्या स्त्री चा चारित्र्य हनन करणारा. जोडप पहिला थोड अस्वस्थ, मग मात्र तिसरया पत्रानंतर त्यांनी कॅमेरा बसवला.

टाकून द्या ह्या वंगाळ सवयी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 11/04/2010 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
टाकून द्या ह्या वंगाळ सवयी
(सरकारी झैरातीत असल्या कविता असतात का?)
दारू पिवून शरीराचा नाश तुमी का करता मला समजत नाही टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||धृ|| दारूमुळं सौंसाराची धुळधाण होई, तिला सोडाया नका करू पण परंतू उगा आजार लावून घ्याल, सांगा माझं म्हनन खरं आहे का नाही? टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||१|| असलीच सवय हाये पान तंबाकूची, अन त्ये खावून जागीच थुंकायची दुसरं कायतरी काम करा, उगा म्हनं तंबाकूबिगर येळ माजा जात नाही टाकून
काव्यरस