Skip to main content

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

मातृदिनानिमित्त...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 08/05/2010 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
आईपणाचा उदोउदो... मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.

[कोणता फोटो णैसर्गिक वाटतो]

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 07/05/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एकाच दृष्याच्या दोन वेग वेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत.

कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 07/05/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे. या चाचणीचं प्रयोजन कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही.

सोने = ५०० रु./ तोळा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 07/05/2010 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५ आगस्ट २४२० भारतीय पंतप्राधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेउन अमेरीकेस भरघोस मदतीची घोषणा केली. . . . . . . भारत हा एक शांतताप्रिय आणि खरोखरीच एक शांत देश आहे. . . .

गणपतीपूळे

लेखक वैदेहीजी यांनी शुक्रवार, 07/05/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीपूळे मंदीर
प्रदक्षिणा मार्ग

हळू हळू...चालव तुझी फटफटी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 07/05/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू...चालव तुझी फटफटी तुझ्या मागे बसायची वाटत नाही भिती तरीही तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी ||धृ|| घरी न बोलता आले निघून केवळ तूझ्या सांगाव्या वरून कॉलेजला जाते खोटं बोलता घरी संशय न कसला आता मोकळी झाले मी, न पाठी कटकटी ||१|| आता तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी तोंड झाकले रुमालाने रे न चेहेरा दिसे माझा कूणाला बापही जरी आला समोरी तो न ओळखी मला आता घाई कशाला, नको त्या कसल्या लटपटी ||२|| म्हणून तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी आडव्या तिरप्या रस्त्यांनी जावूनी फिरव मला सारे गाव ओळख
काव्यरस

कलि...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/05/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचे विशेष कोर्टाने निकाल दिला…! अ‍ॅड. उज्वल निकमांच्या कारकिर्दीत अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला. कृरकर्मा अजमल ‘कसाब’ ला फ़ाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एकुण चार गुन्ह्यांसाठी मरेपर्यंत फाशी आणि पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप. फाशी : १६६ निरपराधांची हत्या व हत्येचा कट, हत्येसाठी मदत करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कृत्य इ. गुन्ह्यांसाठी फ़ाशी. जन्मठेप : हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान व स्फोटकेविषयक कायदा याच्याशी संबंधीत पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप. शिक्षा ऐकली आणि त्या तीन दिवसात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या पत्थरदील कसाबचा घसाच कोरडा पडला.

पुणे ते नासिकः गडकोटांच्या साक्षीने, रेल्वेच्या मार्गाने

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 07/05/2010 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते नासिक व्हाया पनवेल हा रेल्वे मार्गाचा प्रवास इतरांसाठी सर्वसाधारणपणे लांबचा (बसमार्गापेक्षा १ तास जास्त) व कंटाळवाणा असला तरी आम्हा सह्याद्रीप्रेमींसाठी खूपच आनंददायक कारण ह्या सबंध प्रवासात सह्यधारेवरील २ घाट व अनेक किल्ले व सुळके यांचे उत्कट व उत्कृष्ट दर्शन होते. रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्‍यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत. आता उजवीकडे तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर दिसू लागतो व लगेचच डावीकडे घोराडेश्वराची लेणी लक्ष्य वेधून घेतात.