Skip to main content

मीटींगा

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 05/05/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यालयात चालणार्‍या मीटींगा हा एक फार गमतीदार प्रकार आहे. अर्थात यात विविध प्रकारची ज्ञानवाटणी सत्रे (नॉलेज-शेअरींग सेशन्स), दूरध्वनी मीटींगा (कॉल्स), एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयोजित केलेली मेंदूवात सत्रे (म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स अर्थात मेंदूला वात आणणारी सत्रे) इत्यादी देखील ग्राह्य धरता येतात. मला नेहमीच खूप लांबलेल्या मीटींगांमध्ये सगळ्यांना येते तशी झोप येत नाही पण कंटाळलेल्या सदस्यांचे निरीक्षण करण्यात खूप मजा वाटते. अर्थात मी देखील कंटाळलो असेल तरच!

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 05/05/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते. पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते. किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धाथीर् शब्द असल्यागत आपली वाटचाल चालू असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात.

दुनियादारी-एक फोटु जमावण्यासाठी प्रयत्न update 2

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 04/05/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगला बसलेले उगाच हलवल. पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internetच्या माध्यमातुन काय करता येईल?? तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल ht

वार्‍यावरती भुरभुरती केस

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 04/05/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
वार्‍यावरती भुरभुरती केस
तू समोर अचानक उभी, वार्‍यावरती भुरभुरती केस पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ|| तसाच बांधा अन रंगही कांतीचा गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग काय अवस्था केलीस? ||१|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... ओळखीचे ते रूप मनामध्ये खोल आवेग अनावर, खेचतो मज तुजसमीप ताबा न मनावर ||२|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... कशास जुने काढावे, नवे आचरावे एकदा वळून बघ, समजते मज जरी तू तीच नसतेस ||३|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस?
काव्यरस

दूर्मीळ पुस्तक संपदा

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 04/05/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
बिपिनने आपल्या वाचनाच्या आवडीचा प्रवास इथे मांडल्यावर मी पण व्यावसायिक वाचक असल्याने एक वेगळी कल्पना डॊक्यात आली. मिसळपावावर समृद्ध वाचन असणारे बरेच जण आहेत. या बर्‍याचजणांकडे **दूर्मिळ ग्रंथसंपदा** असायची पण शक्यता आहे. तशी असल्यास त्याची यादी इथे द्यावी. सुरुवात म्हणून माझ्याकडच्या काही दूर्मिळ मराठी पुस्तकांची यादी देतो. मनुस्मतीचे मराठी भाषांतर (१८८५) सरस्वती कोश खंड १ व २ (१९३०) मोरोपंतकृत केकावली माझे पणजोबा कै वि.सी.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

लेखक Nile यांनी मंगळवार, 04/05/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

आभास

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 04/05/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं नातच आभासांचं कधी खूप खूप खोल वाटणारं, थेट जाउन हृदयाला भिडणारं, काळजाला हात घालणारं, पण कधी क्षणात उथळ होणारं, अनोळखी वाटणारं ! मग खरं काय असतं ? ते खूप खोलवर घाव घालणारं, हृदयाला साद घालणारं ? का पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ? शेवटी आभासच सारे ! त्यात खरं काय आणि खोटं काय ! तुझं माझं नातच आभासांचं शब्दांशिवायच भावना बोलणारं, मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं, हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं, पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं निशब्दता पण अनोळखी होते. मग खरं काय असतं ?
काव्यरस