Skip to main content

आईपणाचा उदोउदो

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 06/05/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.

कसाबला अखेर फाशी

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 06/05/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी कसाब याला न्यायालयाने दोशी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. त्याला वरील न्यायालयात अपील करु न देता लागलीच शिक्षेची अंबलबजावणी करावी . या हल्ल्यात शहीद झालेल्याना खर्‍या अर्थाने आता न्याय मिळेल असे वाटते. अमोल -------------------------------------------------------------------------------

शांततेचं कार्टं चालु आहे ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 06/05/2010 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, तुम्हाला 'शिवाजी पार्क' किंवा 'शिवतिर्थ' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येते ? "माझ्या तमाम हिंदु/मराठी बंधु-भगिनीं आणि मातांना माझा नमस्कार" अशी साद घालुन आपल्या तडाखेबंद भाषणाची व बर्‍याच वेळ त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणर्‍या बाळासाहेब ठाकरे व आता राज ठाकरे ह्यांच्या लाखोंच्या सभा .... भाजप-सेनेचे महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आल्यावर त्यांनी लोकांसमोर साजरा केलेला "ऐतिहासिक शपथविधी' समारंभ ... आपल्या मिश्किल शैलीत बोलता बोलता विरोधकांना तोंडावर पाडणार्‍या शरद पवार ह्यांच्या लाखा-लाखांच्या सभा .... शिवसेना आणि मनसे सारख्या पक्षांच्या स्

स्त्रीची आजची प्रतिमा - ३

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 06/05/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी, म्हणजे शाळकरी वयात, एके दिवशी एक हिरव्या मुखपृष्ठाचे पुस्तक हातात पडले. वाचायला सुरूवात केली... झपाटल्यासारखे पूर्ण वाचूनच खाली ठेवले. पुस्तक होते, 'अफगाण डायरी'... लेखिका प्रतिभा रानडे. वर्तमानपत्र वाचायची सवय असल्यामुळे त्याआधीही अफगाणिस्तान आणि तिथे चाललेली गडबड वगैरे नियमाने वाचत होतोच. एकंदरीतच या प्रामुख्याने पठाणांच्या देशाबद्दल कुतूहल होतेच. 'अफगाण डायरी' मधून तिथल्या समाजजीवनाचे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजमनाचे अगदी उत्तम दर्शन घडले होतेच. खासकरून तिथल्या स्त्रियांच्या जीवनाबद्दलवगैरे बरेचसे संदर्भ त्या पुस्तकात होते.

'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 06/05/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवा विक्रम होतोय. कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय. काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते. संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती.

अन बुद्ध हसला ...... आणि बुद्धु हसले....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 06/05/2010 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
अन बुद्ध हसला ...... आणि बुद्धु हसले.... ..... अंगुलीमालाने मानवी अवयवांची माळा गळ्यातून उतरवली . पश्चात्तापाने दग्ध हातातील शस्त्र सोपवत बुद्धाकडे पाहिले. करुणेने भारलेली नजर त्याच्या जीवनात नवी पहाट करून गेली...... अन बुद्ध हसला..... ...... कोवळे वय आहे. सुधारकेंद्रातूल मानवीय वागणुकीने तो सुधारेल. .. मग आपल्या घरी परतेल तेंव्हा इतरांना हत्येपासून परावृत्त करेल ... भले त्याला सोडवायला त्याचे साथीदार विविध क्लुप्त्या वापरतील. कदाचित आणखी काही हल्ले होतील. त्याच्यावर कोटयवधी खर्च येईल.

कोणत्या लढाईत शहीद???

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 06/05/2010 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात माझा एक मित्र काही परदेशी पाहुण्यांना अमृतसर दाखवायला घेऊन गेला होता. त्याने जे पाहीलीले सांगीतले, त्याचा खोलवर विचार केला तर एक राष्ट्र म्हणून आपले काय स्थान आणि भवितव्य आहे असा मोठा प्रश्न मनात येतो. आणि त्याचे उत्तर काही आशावादी येत नाही. सुवर्णमंदिराजवळ एक शिखांचे संग्रहालय आहे. तिथे भिंद्रनवालेचे मोठे चित्र लावले आहे. त्यावर मथळा आहे "१९८४ साली शहीद झालेले" हे पाहून परदेशी पाहुण्यांनी विचारले, "१९८४ साली भारताची कुठल्या देशाशी लढाई झाली होती?

मनातले थोडेसे..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 05/05/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही. स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध! आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे.

आज अचानक उदास का वाटे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/05/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक उदास का वाटे आज अचानक उदास का वाटे न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ|| ईकडे पाहून तिकडे पाहून वेळ घालवू किती कसे कोण जाणे कितीक वेळ माझी जाते आज अचानक उदास का वाटे ||१|| किती मी चेहर्‍यांना वाचू किती अनूभव लेखू आवाज जवळी नसतांना साथीचे शब्दही पडत आहे थिटे आज अचानक उदास का वाटे ||२|| दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू येथला निरोपही घेण्या मन माझे आक्रंदूनी उठे आज अचानक उदास का वाटे ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०५/२०१०
काव्यरस