Skip to main content

निसर्गाचा हिशोब

लेखक अरुंधती यांनी रविवार, 09/05/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता.

सोन्याच्या धुराचे ठसके: जरूर वाचावे असे काही

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 09/05/2010 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच डॉ. उज्वला दळवी यांचे 'सोन्याच्या धुराचे ठसके: पाव शतकी सौदी अनुभव' (प्रकाशकः ग्रंथाली) हे अप्रतिम पुस्तक वाचून खाली ठेवले आणि मिपाकडे धाव घेतली. वाटले, हे पुस्तक सर्व मराठी वाचकांनी आवर्जुन वाचलेच पाहिजे इतके सुंदर आहे. लेखिकेची लेखनशैली अतिशय ओघवती अन मिष्किल आहे; वाचक गालातल्या गालात हसत राहतो, कधी अचंबित होतो तर कधी मन विदिर्ण होतं; विशेषतः सौदीतली स्त्रियांची अवस्था वाचतांना.. स्वतः लेखिका एम्.डी मेडिसिन असून आपल्या पतिंसमवेत त्या सौदीमध्ये अजूनही वैद्यकिय सेवा देत आहेत. पुस्तक वाचतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते ती म्हणजे लेखिकेचे अफाट वाचन आणि मराठीवरचे प्रभूत्व!

करभरणा, कराचे उगम, हक्क आणि मुंबई/महाराष्ट्र

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 09/05/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच येथील एका लेखात आणि प्रतिसादात आणि मित्रस्थळांवरील काही चर्चांमधून एक वाक्य पुनःपुन्हा वाचायला मिळाले. "मुंबई/महाराष्ट्रातून देशाला प्रचंड/हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो". वेगवेगळ्या लोकांनी हे वाक्य म्हणताना वेगवेगळ्या संदर्भात म्हटले असले तरी त्याचा गाभा जेथून हा महसूल मिळतो त्या प्रदेशांचा देशावर/किंवा संपत्तीच्या वाटपावर, सरकारी योजनांवर अधिक हक्क असायला हवा असा त्यातला अध्याहृत अर्थ होता. काहींनी तर हे मुंबई/ महाराष्ट्राचे देशावर उपकारच आहेत असा सूर लावला होता आणि महाराष्ट्र उभ्या देशाला "पोसत आहे" असा दावा केला होता. हे वाक्य प्रथमच ऐकायला मिळाले आहे असेही नाही.

आई

लेखक पंचम यांनी रविवार, 09/05/2010 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आई मी सावलीत होतो कल्पतरूच्या तोवरी जाण नव्हती... तो कल्पतरू जळत होता, ज्याची मला तहान होती.... वात्सल्याच्या चार भावना, कुठल्या कुठे विरून गेल्या.... माणुसकी जिथे मातीत मिसळली , ती मातीसुद्धा अजाण होती.... अगतिक मी प्रेमाच्या शोधात चार दिशात हिंडलो. राहूनी या धरेवरती त्या परमेश्वराची आस होती..... शेवटी फिरूनी थकलो, आलो कल्पतरूच्या छायेत.. खरच परमेश्वरच स्थिरवला होता, त्या कल्पतरूच्या मायेत.... मिळाली तिची छाया साताजन्माची उतराई होती, तिच्या कुशीत शांतपणे घेणारी ती कल्पतरू माझी आई होती....... -निशां
काव्यरस

दुनियादारी - एक स्वच्छ्,प्रामाणिक व प्रयत्न

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 09/05/2010 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगल बसलेल उगाच हलवल. पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internet च्या माध्यमातुन काय करता येईल?? तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल htt

सत्यकथा: भाग्यवान बैल!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी रविवार, 09/05/2010 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ९/९/१९९९ रोजी- भगवान सखाराम पाटील रा. देवघर जि. नासिक यांच्या घरी रडारडी चालू होती. जो तो विचारत होता, काय झाले? कोण गेलं? अहो, त्यांचा लाडका सर्जा बैल म्हातारपणामुळे मरण पावला होता. भगवान पाटील यांनी गावोगावी मित्रमंडळी, नातेवाईक व आजूबाजूची ५/१० खेडी यांना बैलाच्या मौतीचे आमंत्रण पाठवले होते व पोळ्याला बैलाचा जसा शृंगार करतात तसा पूर्ण शृंगार मालेगांवहून मागवला. प्रेतयात्रेची जोरदार तयारी झाली. सर्जा बैलाचे प्रेत मोठ्या ट्रकमध्ये सजवून ठेवणात आले. प्रेतयात्रा सेताकडे निघाली तेव्हा जवळपास २५०० - ३००० लोक तेथे जमले.

चेतन भगतला अनावृत्त पत्र

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 09/05/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

महाराष्ट्र प्रेम

लेखक गोगोल यांनी रविवार, 09/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी खर तर हा लेख जयंत कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र प्रेमवरील लेखाला प्रतिसाद म्हणून लिहीत होतो. पण प्रतिसाद लिहील्यावर कळले की त्यांनी (किंवा संपादकांनी) लेखच उडवून लावला. म्हणून हा प्रतिसाद येथे टाकत आहे. थोडासा प्रक्षोभाक आहे आणि मला माहीत आहे की यावर खूप हल्ला होणार (आणि कदाचित विडंबनही येणार:), पण ठीक आहे, मला जे वाटते ते मी येथे मांडतो आहे. जर चुक वाटली तर साधक बधक चर्चा करुन मला तुम्हाला काय वाटते ते पटवून द्या. सर्वप्रथम महाराष्ट्रानी भारताला काय दिले यात स्वातंत्र्यपुर्वीचा काळ समाविष्ट करणे अत्यंत चुकीचे आहे.

'चटकदार' कोल्हापुरी चहा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 08/05/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात.. महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री.

आज साठी खास..

लेखक स्पंदना यांनी शनिवार, 08/05/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार, आज ९ मे; तर आजच्या दिवसाची सुरुवात हिरकणी ला नमन करून करूया. काय? कोण हिरकणी? अहो काजळणाऱ्या दिशांना न डरणारी ; डोळ्यातल्या पाण्यान हतबल न होता उलट ते पाणी शिंपून मातृत्वाच रोपट जोमान जोपासणारी; तान्हुल्याच्या ओढीन शिवरायांचा आदेश धुडकावून रायगडाचा बुरुज लांघणारी. हो तीच; जिची खुद्द शिवबांनी मोहोरांनी ओटी भरली ती . . हिरकणी. जिच्या मातृत्वाची गाणी गात आज ही राय गडावर तो बुरुज उभा आहे ती...हिरकणी. खर तर हा विषय शुची ताईन्चा ; त्यांनी आधीच सुरु केला पण काय झालं कोणास ठाऊक एकदम "आलामंतर कोलामंतर...