विचारु नका ..!
कोण मी मलाच हे विचारू नका
आज मी जिवंत कां विचारू नका...
मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा?
आसवांचे अर्थ मला विचारू नका...
कां असा सुखांचा मार्ग बदलला?
वेदनांचा पत्ता मला विचारू नका...
तो सुर्य, चंद्र..,तारकाही गळाल्या
क्षितीजाचा गाव मला विचारू नका...
कोमेजल्या कळ्या चित्रातल्या?
कां फिकुटले रंग? विचारू नका ...
हरवला भाव सांगा कुणा गवसला?
सोडला ठाव, कां? मला विचारू नका....
विशाल
पाककृती हवी आहे -- फिन्गर मिलेट पीठ
इथे फिंगर millet flour मिळतं ते आणलेलं आहे...एक तर millet म्हणजे काय? नाचणी का ? आणि त्या पीठाच काय काय करता येईल ?
तुझी घागर नळाला लाव...
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.
पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा
काही महिन्यांपूर्वी टाइम्स ग्रूप आणि पाकिस्तानी 'जंग ग्रूप' तर्फे दोन्ही देशांतले संबंध सुधारावेत म्हणून 'अमन की आशा' हा संयुक्त प्रकल्प चालु झाला.दोन्ही देशांत व्यापार उदीम वाढीस लागावा व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत हा हेतु.दोन्ही ग्रूप्स तर्फे काही कार्यक्रमही राबवण्यात आले.
२६/११ नंतर संबंध किती सुधारले हा वादाचा मुद्दा आहे.पण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून्/काही उद्योजकांकडून मात्र अजुनही संबंध वाढवावेत अशी मागणी होते तेव्हा आश्चर्य वाटते.काल दिल्लीत झालेल्या सोहळ्याला प्रणव मुखर्जी(व काही पाकिस्तानी मंत्री) सकट अनेक उद्योजक उपस्थित होते.
(
प्रकाशनातील मनोविकार
प्रकाशनातील मनोविकार
दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला.लेखन प्रकाशन किती सोपे किती अवघड ही मनिषची पोस्टही वाचली. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली."देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"
शीर्षकातील वाक्य.... हे आहे दोन दिवसापूर्वीच दुनळी बंदूक आपल्या नरड्याला लाऊन घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्याने चाप ओढून स्वत:च्या जीवाची अखेर करून घेतलेल्या श्री. रामचंद्र गिरी या फौजदाराच्या चिठ्ठीतील एक वाक्य !
वय वर्षे ५४... "गोसावी" अशा भटक्या (अनुसूचित) जमातीमधील व्यक्ती.... पहिलवानासारखी देहयष्टी... प्रथम पोलीस म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात भरती आणि दहा वर्षाच्या कालावधीतच एक अत्यंत कार्यक्षम आणि कामातील तडफ पाहून वरिष्ठांच्या मर्जीत बसलेले पोलीस अशी ख्याती... शहर, तालुका आणि ग्रामीण भागात सर्वत्रच आपल्या हसर्या चेहर्याने वावरून भोवतालच्या लोकांची मने जिंकण्याची किमया साधलेली....
लेखन आणि प्रकाशन - किती सोपे, किती अवघड?
सकाळ (मुक्तपीठ) मधे हा लेख वाचला, आणि आश्चर्य वाटले.
http://72.78.249.107/esakal/20100517/5127259570058392107.htm
आमच्या मित्राला काय करावे हे कळेना. अक्षरजुळणी करणारे तसेच मुद्रकाचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. शेवटी वैतागून त्यांनी दहा, पंधरा, वीस टक्क्यांनी पुस्तके विकून रिकामे झाले. दहा व वीस टक्के म्हणणाऱ्या दुकानदारांनी रोख पैसे दिले. पंधरा टक्के म्हणणारा सातवा दुकानदार व त्याची पत्नी दोघेही द्विपदवीधर आहेत. त्यांची अ. ब. चौकात दोन मोठी दुकाने आहेत.
प्रतिक्षा ? ? ?
प्रतिक्षा ? ? ?
निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र,
परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या.
न जाणो मिटले ते अन…..
अवतरली तू अवचित…….. .? ? ? ?
आजही स्मरतात ते दिवस .......
धुंद ! धुंद ! !
पुनवेच्या चांदण्यांत,
मोकळ्या केशसंभारांत,
निरागस उभी तू.
मला वाटले,
चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर,
काळ्या मेघाआड.
पुन्हा बहरला तोच वसंत,
तारकांची धुंद बरसात,
आसमंती तोच मंद वारा,
? ? ? ?
काव्यरस
मिसळपाव