सकाळ (मुक्तपीठ) मधे हा लेख वाचला, आणि आश्चर्य वाटले.
http://72.78.249.107/esakal/20100517/5127259570058392107.htm
आमच्या मित्राला काय करावे हे कळेना. अक्षरजुळणी करणारे तसेच मुद्रकाचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. शेवटी वैतागून त्यांनी दहा, पंधरा, वीस टक्क्यांनी पुस्तके विकून रिकामे झाले. दहा व वीस टक्के म्हणणाऱ्या दुकानदारांनी रोख पैसे दिले. पंधरा टक्के म्हणणारा सातवा दुकानदार व त्याची पत्नी दोघेही द्विपदवीधर आहेत. त्यांची अ. ब. चौकात दोन मोठी दुकाने आहेत. त्या दुकानदाराने आमच्या लेखक मित्राला हैराण करून टाकले. तीन महिन्यांचे सहा महिने झाले तरी ते दाद देईनात. त्यांच्याकडे गेल्यावर तिऱ्हाईतासारखे विचारायचे, ""काय पाहिजे?'' कधी ओळखही दाखवायचे नाहीत. आमच्या मित्रांनी कायदेशीर कारवाई करण्याची रजिस्टर पत्राद्वारे दोनदा धमकी दिली, तरीही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अनेक चकरांनंतर त्यांनी शेवटी धनादेश (चेक) दिला, तोही पुढच्या दोन महिन्यांनंतरच्या तारखेचा. नंतर त्यांना कळले, की सदर दुकानदाराने अनेक लेखक, लेखिकांचे पैसे बुडवले आहेत.ह्यात लिहिल्याप्रमाणे त्या लेखकाचे अनुभव फारच भयानक होता. विक्रेते ह्यांचा नफ्यात मोठा हिस्सा असतो, हे माहित होते, पण ते ८५% मागू शकतात हे वाचून थक्क झालो. इथे कोणाला मित्रांचे अथवा स्वतःचे असे अनुभव आहेत का? स्वतःचे पुस्तक प्रकाशित करणे इतके अवघड असते? प्राजु, त्या निमित्ताने तू तुझे अनुभव लिहिल्यास वाचायला आवडेल!
वाचने
5323
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखक तरी इतका डेस्परेट का होतो?
हेच आणि असेच..
In reply to लेखक तरी इतका डेस्परेट का होतो? by भडकमकर मास्तर
आपण
हौस म्हणा...
In reply to आपण by नील_गंधार
थोडं असहमत
In reply to हौस म्हणा... by भडकमकर मास्तर
आपोआप
खरे आहे!
In reply to आपोआप by भडकमकर मास्तर
प्रकाशक नावाची जमात....!