गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)
गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका येथे वाचा
सहलीचा पाचवा दिवस.
आज सोमनाथसाठी प्रवास सुरु करायचा होता. द्वारका ते सोमनाथ प्रवास चार तासांचा (२३०किमी) असला तरी वाटेत काही ठिकाणे बघायची असल्याने हा प्रवास सात-आठ तासांचा होणार होता. सकाळी सात वाजताच चहा पाहिजे म्हणून कॅन्टीनवाल्याला रात्रीच सांगून ठेवले होते. साडेसहालाच सर्व जण तयार होऊन सामानही गाडीत रवाना झाले होते. चहा झाला. हॉटेलचे बिल चुकते करून साडेसातला प्रवास सुरु झाला.
आज पहिला थांबा होता 'पोरबंदर'. रस्ता अतिशय चांगला असून सकाळच्या वेळी रहदारीही जास्त नव्हती.
मिसळपाव