Skip to main content

चंपूची जिंदगी

लेखक फटू यांनी गुरुवार, 13/05/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
चंपूची बायको खुपच हैराण झाली होती नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा ऑफीसात नुसता काम करत बसायचा चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा डेडलाईन पठठया कधी विसरला नाही नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली बॉसला म्
काव्यरस

तुम्हांला हे आठवतयं

लेखक chintamani1969 यांनी गुरुवार, 13/05/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर ....

वर्तूळ

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 13/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तूळ
घाटदार घाट रस्ता नागमोडी चढावा कोणी हिरकंच जंगलात जाई पायवाट बारीकशी त्यात उत्तूंग मंदिराचा डेरेदार कळस जाई नभात नभात निळ्या जलद सावळा एकटा भटका आरसपानी तलावात न्याहळे स्व:ताला पुर्ण करी एका वर्तूळाला - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०५/२०१०
काव्यरस

प्राजुच्या "फुलांची आर्जवे" कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 13/05/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी रविवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजन वाटीकेमध्ये पोहोचलो. "आर्जवे फुलांची " हया प्राजक्ता ( प्राजु ) च्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ. कार्यक्रमाला सुरवात होऊन जवळपास अर्धा-पाऊण तास झाला होता. विशेष म्हणजे प्रकाशित होणार्‍या कवितासंग्रहाची कवयित्री - प्राजक्ता - काही कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकली नाही. कार्यक्रम चित्तरंजन वाटिकेत झाडांच्या दाट सावलीत घेण्यात आला होता. मान्यवर पाहुण्यांसाठी टेबल-खुर्च्या आणि इतर उपस्थितांसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. झाडांवर स्पिकर्स लावण्यात आलेले होते. एकूण व्यवस्था अतिशय चांगली झालेली होती.

".... स्किन काढू का तशीच ठेऊ ?"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 13/05/2010 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावरील एका सदस्येचे "रिक्षावाल्या" बरोबर रिक्षा भाड्याबाबत आलेल्या अनुभवाचा धागा वाचला. तिथे माझीही अशाच धर्तीची प्रतिक्रिया लिहायला गेलो, तर असे आढळू लागले की, मूळ लेखापेक्षा माझी प्रतिक्रिया खूपच लांबलचक होऊ लागली आहे, तेव्हा ती तिथे न देता म्हटले चला या बाबीचा आपला असा एक स्वतंत्र धागा करू या... तो असा >>) आम्ही कोल्हापूरकर मटण, मासे, चिकन (खाण्यामध्ये विशेषत:...) मध्ये भलतेच "हुशार", पण आमची ही हुशारी फक्त खाण्यात. खरेदीमधील खाचखळग्यात मला शून्य ज्ञान. मटण म्हणजे दुकानदार जे देतो ते मटण, मग ते बोकडाचे आहे की, मेंढ्याचे, की पालव्याचे इ. सूक्ष्मबाबींचे माझे अगाध अज्ञान.

एका शाळकरी मुलाचा निबंध

लेखक वैदेहीजी यांनी गुरुवार, 13/05/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका प्राथमिक विभागातल्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याना एक निबंध लिहायला दिलीला असतो. निबंधा चा विषय असतो "देवाने मला काय बनवावे ?" त्यादिवशी घरी निबंधवह्या तपासताना ती एक निबंध वाचते आणि भावूक होवून जाते. तिचे पती आपया बायकोला असे भावूक होऊन रडताना बघतात आणि तिला रडण्याचे कारण विचारतात ती काही न बोलता समोरची वही उचलून दाखवते . ते निंबंध वाचतात जो खालील प्रमाणे असतो " देव बाप्पा ! मला जादूने जर काय बनवणारच असशील तर "टीव्ही" बनव . मला त्याची जागा घ्याची आहे. मला टीव्ही सारखा जीवन हवय. त्याचे माझ्या कुटुंबां मधील जे अढळ पद आहे ते मला हवाय .

ब्रेक्फास्ट

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 13/05/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
एकवेळ लन्च स्किप केले तरी चालेल पण हेवी ब्रेक्फास्ट घ्यावा असे म्हणतात. पण मला नाही बै रोज वेळ मिळत ब्रेक्फास्ट करायला. आणी मग ऑफिसमधे चिडचिड होते. आणी रोज काय करायचे तरी काय पोहे उप्मा थालिपिठाच्या पलिकडे जाउन (केलॉग्ज खाउन विटलेय मी ) आज त्यातल्या त्यात मी पोहे न आम्ब्याच्या फोडी घेवुन आले. घरी कुठे वेळ मिळतो हो (मेकअप करता करता मेला वेळ कसा जातो कळतच नाही) तुम्हाला काही सोप्या ब्रेक्फास्ट पाकक्रुती माहिती असतिल तर सुचवा. :>

पुण्य

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/05/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका ग्रंथाचे भाषांतर करताना पुण्य या शब्दावर अडकलोय. पुण्य या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द कोणाला सुचतोय का. पुण्य हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाला जवळ जाणारा शब्द व्हर्च्यू हा शब्द आहे. पण तो चपखल बसत नाही. वर्च्यू ची पुण्याप्रमाणे साठवण होत नाही. . गेल्या जन्मीचे पुण्य ही संकल्पना कशी मांडायची? भाषा ही संस्कृती चा दर्पण असतो. अभ्यासूनी जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.

एका रिक्षावाल्याची गोष्ट

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 12/05/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या" "आठ कसले ?