"काय मग? लग्नानंतर कुठे जाणार फिरायला?" हा लग्नसमारंभात भेटायला येणार्या लोकांनी विचारायच्या टॉप १० प्रश्नांपैकी एक हे आता कळून चुकले होते. मला त्या प्रश्नांची सवय झाली असली तरी लोकांना माझ्या उत्तराची सवय नसावी बहुतेक. मी सांगायचो "अंदमान" आणि लोक मग मला तिथे काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठविल्यासारखे "अंदमान?!?" असा प्रतिप्रश्न विचारायचे.
काहि लोकांनी अंदमान म्हटल्यावर विचारलेल्या शंकांनी तर माझं भलतंच मनोरंजन झालं
"स्वा. सावरकरांचा जन्म तिथलाच ना रे?"
"अरे तिथे फक्त आदिवसी रहातात ना.. तिथे जाणार आहेस?"
"ओह अंदमान.. मग लक्षद्वीप पण करणार का?"
"तिथे जायला सरकारची परवानगी लागते ना?"
"तिथे १० दिवस काय करणार? फक्त सेल्युलर जेल आणि १-२ बिचेस इतकच आहे ना तिथे बघायला?"
हे प्रश्न ऐकले आणि जाणवलं की भारताच्या ह्या अविभाज्य भागाबद्दल अजून बरेच समज-गैरसमज आहेत. खरंतर तेथील अनुभव, वर्णन लिहावं यासाठी स्फुर्ती लोकांच्या ह्या अशा प्रश्नांनी दिली. :)
काहि अंशी मजेचा भाग सोडला तरी अंदमान बेटे भारतातील सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत हे नक्की. केंद्रशासित असल्याने म्हणा, भारतापासून भौगोलिकदृष्ट्या दुर असल्याने म्हणा, कमी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा काहि सरकारी धोरणे/नियम यामुळे म्हणा ही बेटे अजूनही केवळ आणि केवळ सौंदर्यवान आहेत. जगातील सर्वोत्तम डायविंग साईट्स पैकी एक असणारे अंदमान विदेशी पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते आहे.
असो, तर (एकदाचे) लग्न आणि अंदमानचे वेध दोन्ही एकत्रच लागले. "कोणत्या टूर बरोबर चालला आहेस?" ह्या प्रश्नकर्त्यांना "स्वतःच सगळं अरेंज केलं आहे" हे सांगून अजून चिंतेत टाकत होतो. एरवी दारातूनच निश्चिंत टाटा करणारे आई-बाबा सून आल्याबरोबर चेन्नईच्या गाडीत बसवायला थेट सीएस्टी पर्यंत आले. अगदी "गाडी सुटली रुमाल हलले.. " वगैरे सीन झाला नसला तरी त्यांना दिसेनासे होईपर्यंत अच्छा केलं आणि आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. ट्रेनमधील मजेशीर प्रवासी नेहमीप्रमाणे माझी करमणूक करत होते. मजल दर मजल करीत चेन्नई आलं आणि तमिळ गलक्यातून वाचवणारी "प्री पेड रिक्षा" सर्विस बघुन आनंद झाला. दुसर्या दिवशी सकाळी अंदमानचे विमान होते. अंदमानमधी वास्तव्याचे कन्फर्मेशन, विमानाची वेळ नक्की करून, रिक्षावाल्याला सकाळीच बोलावून लवकरच झोपलो. सकाळी वेळेवर आलेला रिक्षावाला सोडल्यास सांगण्यासारखं काहि विषेश घडलंच नाहि. आमच्या विमानाने चेन्नईहून उड्डाण केलं आणि भारताची मुख्यभूमी आम्ही त्या तिथे पलिकडे तिकडे जाण्यासाठी सोडली.
दोन तास विमानात काढले. विमानात अर्ध्याहून अधिक प्रवासी परदेशी होते. त्यांना अंदमानमधील विविध ठिकाणांबद्द्ल इत्यंभूत माहिती (आपल्या लोकांना नसलेली) होती हे विषेश. असो, तर विमानाने आपले नाक खाली केले आणि आम्ही खिडकीच्या काचेला लावले. समोर हिरव्या कंच वनश्रीने नटलेली बेटं, निळेशार पाणी आणि त्यांना दुभागणारी किनार्याची चंदरी रेघ हे तीनच रंग कलिजा खलास करत होते..
(वरील चित्र जालावरून साभार)
ते दृश्य बघूनच पुढील दहा दिवस पृथ्वीवरील एका वेगळ्या नितांत सुंदर भागात जाणार असल्याची खात्री पटली. "अहा!" या अर्थाच्या बहुभाषिक सार्वजनिक चित्कारांमधेच विमानाने जमिनीला पाय टेकले. पोर्ट ब्लेअर हा एक छोटेखानी विमानतळ. भारतातील बर्याचश्या शहरांप्रमाणे मुळ वायुदलाचा विमानतळ जो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. बाहेर आलो. टॅक्सीवाले बरेच होते पण भारतातील इतर शहरांच्या विपरीत टॅक्सीवाले भलतेच सोज्वळ निघाले. एकदा फारतर दोनदा टॅक्सी हवी आहे का विचारले आणि नको म्हटल्यावर मागे लागायचे नाहित. एखाद्या देशाचे कस्टम्सवाले त्या देशाचे आणि गावचे टॅक्सीवाले त्या गावच्या स्वभावाचे पहिले दर्शन घडवतात असे म्हणतात ते काहि खोटं नाहि. पुढे संपूर्ण ट्रीपभर आम्हाला ह्या त्रास न देण्याच्या किंबहूना मदतीसाठी तत्पर वागणूकीचा प्रत्यय येत राहिला.
तर आम्ही हॉटेलवर ब्यागा टाकल्या-जेवलो आणि तडक बाहेर पडलो. अंदमानला जायचे ठरल्यापासून "सेल्युलर जेल" - सावरकरांच्या व इतर अनेक क्रांतीकारकांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु- बघण्याची, अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आराम वगैरे न करता तडक निघालो. तसंही पंढरपूरला गेल्यावर आधी विठोबाचं दर्शन आणि मग इतर रिवाज करायचे असतात त्याप्रमाणे अखिल भारताच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याचे दर्शन घेऊन पुढील बेत आखणे योग्यच होते.
रिक्षा थांबली आणि समोर "सेल्युलर जेल" लिहिलेली उंच वास्तु उभी होती. एकेकाळी असंख्या क्रांतीवीराचे भक्तीस्थानच. इथे आलो की त्या देशभक्तांच्या कार्याला नवा अर्थ प्राप्त व्हायचा.
आत शिरलो आणि समोरचीच्या प्रमाणबद्ध वास्तुकडे बघतच राहिलो. अतिशय प्रमाणबद्ध रचना आणि त्यामुळे सौंदर्याचे दर्शन करवणारी ती इमारत एकेकाळी कितीतरी जुलुम बघत होती. एकेका 'सेल' समोरून जाताना मनात भावनांचे काहूर माजले होते. एकेका क्रांतीकारकाला ह्याच सेल मधे ठेवले जायचे. त्यात जेलर हा कर्दनकाळ! मुळ भूमीपासून इतक्या दूरवरचा जेलर म्हणजे तेथील अनभिषिक्त सम्राट. त्याने इथे काहिहि केले तरी बातमी बाहेर जाणे कर्मकठीण. ह्या जेलमधे फक्त जन्मठेपेचे आणि फाशीचे कैदीच येत. अश्याच वेळी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगमन झाले. त्यांचा दरारा इतका की त्यांच्या साठी एका कोपर्यातील सेल दिला गेला आणि त्यांच्या बाजुचा सेल रिकामा ठेवला गेला. त्यांना आणले हे इतके गुप्त होते की त्यांच्या भावाला वर्षभर हे माहित नव्हते की सावरकर व ते एकाच जेलमधे आहेत.
जेव्हा सावरकरांचा सेल जवळ येत होता तेव्हा मन धडधडत होते.. हा सेल अजूनहि तसाच जपला आहे. सावरकरांच्या पळून जाण्याच्या भीतीमुळे दोन दरवाजे असलेल्या त्या सेल मधे एकटाच आत गेलो.. थोडावे़ळ एकटाच थांबलो.. मन आणि डोळे दोन्ही भरून आले. हीच ती जागा जिथे तात्याराव वर्षानुवर्षे होते. त्यांना हे आकाश असेच दिसत असेल. (चौथा फोटो सावरकरांच्या सेल मधून दिसणारा बाहेरच्या जगातील तुकडा दाखवतो) ह्या गजांतून ह्याच परिसराच्या तुकड्याकडे बघत जेव्हा त्यांना पेन पेपर नाकारला तेव्हा भिंतीवर खंडकाव्य लिहिले असेल. शरीरावरचा रोम अन रोम पुलकित झाला होता. जड अंतकरणाने त्या सेल मधून बाहेर निघालो.
संध्याकाळ होऊन सूर्य विझेपर्यंत असाच अख्ख्या जेलभर भटकत होतो. जिथे फाशी द्यायचे ती जागा, कोलू चालवायला लावायचे ती जागा बघून अंगावर येणारा काटा घालवता जात नव्हता. संध्याकाळी होणारा लाईट अॅंड साऊंड शो हा देखील सुंदर. त्या जागेची उत्तम माहिती देणारा त्याच बरोबर स्वा. सावरकर, नेताजी बोस, योगेंद्र शुक्ला, बटुकेशवर दत्त यांच्या आठवणी जागवल्या जातात. अत्यंत धीरगंभीर आवाजात हे जेल आपल्याला त्याची कहाणी सांगते आणि आपण भारवलेल्या स्थितीत बाहेर पडतो.
हे जेल 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील एक काळी तितकीच स्फुर्तिदाय स्मृती जागृत ठेवतच आहे त्याच बरोबर वेळच्यावेळी डागडुजी, सफाई व रंगरंगोटी होते आहे हे बघून खूप बरे वाटले. प्रत्येकाने बघावेच असे हे स्थळ.. प्रत्येकाने इतिहास शोधण्यासाठी तर बघावेच पण स्वतःला शोधाण्यासाठी जरूर बघावे!
(पुढील भागातः बारतांग बेट व 'जारवा' जमात)
(वरील चित्र जालावरून साभार)
ते दृश्य बघूनच पुढील दहा दिवस पृथ्वीवरील एका वेगळ्या नितांत सुंदर भागात जाणार असल्याची खात्री पटली. "अहा!" या अर्थाच्या बहुभाषिक सार्वजनिक चित्कारांमधेच विमानाने जमिनीला पाय टेकले. पोर्ट ब्लेअर हा एक छोटेखानी विमानतळ. भारतातील बर्याचश्या शहरांप्रमाणे मुळ वायुदलाचा विमानतळ जो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. बाहेर आलो. टॅक्सीवाले बरेच होते पण भारतातील इतर शहरांच्या विपरीत टॅक्सीवाले भलतेच सोज्वळ निघाले. एकदा फारतर दोनदा टॅक्सी हवी आहे का विचारले आणि नको म्हटल्यावर मागे लागायचे नाहित. एखाद्या देशाचे कस्टम्सवाले त्या देशाचे आणि गावचे टॅक्सीवाले त्या गावच्या स्वभावाचे पहिले दर्शन घडवतात असे म्हणतात ते काहि खोटं नाहि. पुढे संपूर्ण ट्रीपभर आम्हाला ह्या त्रास न देण्याच्या किंबहूना मदतीसाठी तत्पर वागणूकीचा प्रत्यय येत राहिला.
तर आम्ही हॉटेलवर ब्यागा टाकल्या-जेवलो आणि तडक बाहेर पडलो. अंदमानला जायचे ठरल्यापासून "सेल्युलर जेल" - सावरकरांच्या व इतर अनेक क्रांतीकारकांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु- बघण्याची, अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आराम वगैरे न करता तडक निघालो. तसंही पंढरपूरला गेल्यावर आधी विठोबाचं दर्शन आणि मग इतर रिवाज करायचे असतात त्याप्रमाणे अखिल भारताच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याचे दर्शन घेऊन पुढील बेत आखणे योग्यच होते.
रिक्षा थांबली आणि समोर "सेल्युलर जेल" लिहिलेली उंच वास्तु उभी होती. एकेकाळी असंख्या क्रांतीवीराचे भक्तीस्थानच. इथे आलो की त्या देशभक्तांच्या कार्याला नवा अर्थ प्राप्त व्हायचा.
याद्या
11858
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही आहे
ऋषिकेश
हात्तिच्य
सुंदर लिहिलय....
ऋष्या, सफर
+१
In reply to ऋष्या, सफर by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिला फोटू
स्सही रे....!
मस्त रे ऋषी!!
>>लग्नानंतर
In reply to मस्त रे ऋषी!! by चतुरंग
छान
पुढील भाग
खुप
मस्त
ऋषी.. सर्वा
छानच
हनिमुन
हॅ हॅ हॅ
In reply to हनिमुन by Nile
हा हा हा!
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो!
In reply to मस्त by नंदन
मस्त लिहले
उत्तम सुरुवात.
उत्तम!
अंदमून टुर
आम्हीसुद्धा
व्वा..
ऋषिकेश, सुर
In reply to व्वा.. by स्वाती दिनेश
छान वृत्तांत
सहीच रे ऋषिकेश...
आभार
सहीच
अभिनंदन