Skip to main content

मोहविते मज तव गंधीत कांती

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोहविते मज तव गंधीत कांती
चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात. (मी काही गायक नाही.
काव्यरस

परीक्षा असत्या तर...... एक भयनिबंध!!!

लेखक प्रमोद काळे यांनी शुक्रवार, 14/05/2010 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १३/०४/२०३५, पुणे, आजचा होमवर्क : मराठी: निबंध लिहा : विषय : परीक्षा असत्या तर...... आज सरांनी हा भंगार विषय निबंध लिहायला म्हणून दिला. मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ? वर्गात या,काय ते बोला आणि घंटा वाजल्यावर जा की..... आम्हाला काय हवं ते आम्ही घेऊ. बाकीचं सोडून देऊ. मुळात भाषा ही काय शिकायची गोष्ट आहे ? आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ? पण सरकारला काय समजत नाय असं पप्पा म्हणतातच ना.... इंग्लिश, हिंदी, मराठी आणि शिवाय एक जागतिक भाषा.....

हम आज अपनी मौत का सामान ले चले ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/05/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ऒफ़ीसला येताना, मध्येच एका ठिकाणी सिग्नल लागल्याने थांबावे लागले. बाईकचे इंजीन बंद केले आणि आपली पाळी येण्याची , सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहात थांबून राहीलो. शेजारी एक रंग ओळखू न येणारी डबडा मारुती ८०० येवुन उभी राहीली. मी एकदा तिच्या एकंदर बाह्यरुपाकडे बघितलं आणि नाक मुरडलं. एकदर रंग करडा किंवा तत्सम कुठलासा होता. आणि मालकाने बहुदा तीला गेल्या महिन्या-दोन महिन्यात साफ़ करण्याची तसदी घेतली नव्हती. मी तोंड वाकडे करत खिडकीतून आत डोकावलो. एक साठीच्या घरातले काका गाडी चालवत होते. त्याच्याकडे पाहताना माझ्या लक्षात आले की गाडीत अगदी हळु आवाजात कुठलंसं जुनं गाणं लागलय.

“बुडीत खाते“ माझेहि ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 14/05/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल कोरीच पान आयुष्याची ! ! !
काव्यरस

सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 14/05/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
"अबे पश्या! साल्या, १ तास झाला बसची वाट बघतोय" स्वानंद "येईल रे... मी नेहमी इथूनच (राजाराम पुल) सिंहगडला जाणारी बस पकडतो" "सकाळच्या ६ पासून उभे आहोत इथे... आता ७.१५ झाले... ७ च्या आत सिंहगड चढायला सुरुवात करायचा बेत होता आपला... आत कसले आपण तोरण्यावर पोचतोय एका दिवसात... शक्यच नाही..." "पोचणार रे... समजा ८ ला सिंहगड चढायला सुरुवात केली, तर ९ ला वरती... मग साधारण संध्याकाळी ५ ला राजगडावर आणि मग रात्री १० पर्यंत तोरण्यावर... काळोख पडला तरी चालत राहायचं... ही बघ! बस पण आली..." सिंहगड चढायचा, मग डोंगर रांगेवरुन विंजरहून राजगड आणि मग डोंगर रांगेवरुन तोरणा... हे सगळं एका दिवसात करायचं...

सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 14/05/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सिगरेट कशी सोडावी अश्या आशयाचा एक लेख मधे पहाण्यात आला होता. मी माझी सिगरेट ओढण्याची १४-१५ वर्ष जुनी सवय गेल्या जुलै महिन्यात सोडली. त्या आधी २ वर्षापूर्वी अ‍ॅलन कार नामक ग्रुहस्थाचे पुस्तक वाचून मी २ महिन्यांसाठी सिग्रेट सोडली होती. पण परत माज करून ओढायला सुरवात केली. पण हे पुस्तक मला उपयोगी वाटले. आपल्यापैकी कुणाला सिग्रेट सोडायची असल्यास हे पुस्तक जरूर वाचून पहा. आणि फायदा झाल्यास नक्की कळवा इथे पिडिएफ चढवायची सोय नाही त्यामुळे हे पिडिएफ स्वरूपातील पुस्तक मिमराठीवर चढवले आहे.

तुम्ही कशी चर्चा करता ?

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 14/05/2010 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बर्यापैकी टोलवाटोलवी चालली असल्याकारणाने आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला.. तुम्हाला कसे भांडायला चुकले चर्चा करायला आवडते/ जमते...आडवळनाने, खवचटपणे का समोरासमोर आणि स्पष्ट ?

चमचे, डाव आणि पळ्या

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 14/05/2010 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
(स्वगतः हल्लीच अमेरिकेत कमावलेले अनेक डॉलर भारताची इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी सत्पात्री, तेही एका हाताचे दुसर्‍या हातालाही न कळता दान दिले गेल्याची गोड बातमी सगळीकडे मधुर फुलांचा सुगंध जसा पसरल्याशिवाय राहत नाही तशी कर्णोकर्णी पसरली असावी. आणि सगळीकडून प्रेमळ हक्क दाखवणार्‍या लोकांनी या दानाविषयी माहिती काढून घ्यायला गराडा घातला. हक्काच्या लोकांनी आस्थेने चौकशी केल्याने झालेला आनंद जणू कमी आहे म्हणून की काय, पण आद्य माननीय मालक आणि आणीबाणीकार, तसेच फाटेमार, चपलाकार, आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमातील महिलांचे बंधु आणि तारणहार श्री.